मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड च्या वतीने दर्यापूर येथे प्रशिक्षण कार्यशाळा

दर्यापूर – महेश बुंदे

मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड पुणे, अमरावती द्वारा आयोजीत दर्यापूर येथील जिजाई प्रतिष्ठान केंद्रामध्ये लघुउद्योगाचे मार्गदर्शन, उद्योजकीय व्यक्तिमत्व, विकास, ध्येय निश्चिती, संभाव्य कौशल्य, हिशोब व्यवस्थापन या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम तसेच कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करायचे आहेत.

मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड पुणे, अमरावती द्वारा आयोजीत जनरल प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांकरिता उद्योजकता विकास या विषयावर १२ दिवसीय मोफत कार्यशाळा होणार आहे. इच्छुक व गरजू उमेदवारांनी जिल्हा परिषद कन्या शाळेच्या बाजूला असलेल्या जिजाई प्रतिष्ठान या केंद्रामध्ये ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे. अधिक माहितीसाठी ७७९८४११४२५, ८२७५३०७७०३, ९५११८५४३०५ दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.

टीप —–

उमेदवाराची निवड प्रत्यक्ष मुलाखती द्वारे करण्यात येईल, मुलाखती करिता आपले मूळ (ओरिजनल) कागदपत्रे सोबत आणावे. सदर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास प्रमाणपत्र देण्यात येईल. पात्रता – किमान १० पास, वयोमर्यादा १८ ते ४५ वर्ष, अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असावा, आवश्यक कागदपत्रे – गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट, दोन पासपोर्ट फोटो, ओळखपत्र, बँकेचा थकबाकीदार नसावा.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!