रवि मारोटकर ब्युरो चीफ
अमरावती वार्ता:- स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत येथील पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शपथ घेण्यात आली. कार्यक्रमलामा पंचायत समितीच्या मा. सभापती सौ वैशाली रिठे,गटविकास अधिकारी खांनदे ,तालुका वैद्यकिय अधीकारी मा डॉ.स्वप्नील मालखेडे ,एकात्मिक बाल विकास अधिकारी गलफट ,पंचायत समिती सदस्य मेश्राम ,सचिन रिठे, सोनोने तथा अधिकारी व कर्मचारी ऊपस्थीत होते.

या प्रसंगी कुष्ठरोग तंत्रज्ञ श्री शरद अंबाडकर यांनी ऊपस्थीतांना कुष्ठरूग्णांना योग्य उपचार व सहकार्याबाबत आवाहन करून माहात्मा गांधीजीं यांच्या “कुष्ठरोग मुक्त भारत “ हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करूयात, सोबतच “कुष्ठरोगा विरूध्द अखेरचे युद्ध” हे घोषवाक्य सर्व जनतेपर्यत पोहचवुन कुष्ठरुग्णा सोबत कुठल्या प्रकारचा भेदभाव करू नये योग्य ती मदत मिळावी याबाबत जानजागृती करण्याबाबत ऊपस्थीतांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधीकारी कार्यालयातील सर्व अधीकारी कर्मचारी ऊपस्थीत होते.
