Post Views: 451
मंगरुळपीर पोलिस आणी महसुल प्रशासकिय अधिकार्यांच्या ऊपस्थीतीत नोव्हेंबरमध्ये दफन केलेल्या ‘त्या’ चिमूकल्याचा मृतदेह ऊकरुन होणार शवविच्छेदन
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-बाहेरराज्यातील एका चिमूकल्याचा संशयास्पद मृत्यु झाल्याची आणी सदर मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावुन दफन केल्याची तक्रार शेलुबाजार येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने केल्यानंतर शेवटी मंगरुळपीर पो.स्टे.च्या संदर्भीय पञानूसार कलम १७६ (०३) सि.आर.पि.सी.प्रमाणे कार्यवाहीकरीता पंच म्हणून मंगरुळपीर येथील नायब तहसिलदार,शेलु.खु.चे मंडळ अधिकारी,मौजा तर्हाळा येथील तलाठी यांना तहसिलदार यांनी एका पञाव्दारे पुढील कार्यवाहीसाठी आदेशित केले आहे.
पोलिस निरिक्षक पो.स्टे.मंगरुळपीर यांनी सदर्भीय पञानुसार सूचित केल्यानुसार मौजे तर्हाळा येथील मयत वय वर्ष ४ असलेल्या एका चिमुकल्या मुलास दि.२०/११/२०२१ रोजी ग्राम तर्हाळा ता.मंगरुळपीर येथील मुस्लिम कब्रस्थानमध्ये दफन करण्यात आले आहे.त्याच्या मृतुचे निश्चितीकरण निष्पन्न करण्याकरीता सदरचे प्रेत ऊकरुन त्याचे पोर्टमार्टेम करणे आवश्यक आहे व कलम १७६ (०३) सि.आर.पि.सी.प्रमाणे कार्यवाही करण्याकरीता विनंती केली आहे.पंच म्हणून महसुलचे कर्मचारी नियुक्त तहसिलदार यांनी एका पञाव्दारे केले आहे.
सदर प्रकरणी याआधी पोलिस प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झाल्यामुळे हा प्रेत ऊकरुन शवविच्छेदनाचा तसेच मृत्युचे कारण निश्चीतीकरणाचा निर्णय घेतल्याचे समजते.