चिंबळी दि२८(वार्ताहर) महिलांनसाठी विविध योजना राबविण्यात येणार असून यामध्ये मशिन क्लास रांगोळी स्पर्धा विविध विषयांवर प्रशिक्षण आदि उपक्रम राबविले जाणार असुन गायकवाड वस्ती येथील खंडोबा मंदिर येथे आरोग्याच्या दृष्टीने शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे व या मंदिराच्या संपुर्ण परिसरात रंगरगोटी करून सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे सरपंच कविता गायकवाड यांनी सांगितले
कुरुळी (ता खेड) प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक सामाजिक कार्य म्हणून सतीआई महिला बचत गटांच्या वतीने गायकवाड वस्ती येथील बैल गाडा घाटातील श्री खंडोबा मंदिर येथे हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सरपंच कविता गायकवाड यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचा सुभारभ करण्यात आला होता .
