Post Views: 446
०७ इसमांसह १०,६९,९७५/- रुपयाची मुददेमाल जप्त
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक
उपक्रम हाती घेतले. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता,जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहाण्याकरीता वेळोवेळी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम,शस्त्र अधिनियम,दारुबंदी अधिनियम,जुगार, अवैध गुटखा प्रकरणी कार्यवाही करुन गुन्हेगारांना कायदयाचा बडगा दाखविला आहे.
वाशिम जिल्हयात अवैध धंदयावर कारवाईचे सत्र सुरु असताना दिनांक २७/०१/२०२२ रोजी मा.पोलीस अधीक्षक साहेब वाशिम यांना पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण हद्दीमध्ये जुगार व वरली मटका सुरू असल्याचे गोपनिय बातमी मिळाली त्यावर मा. अपर पोलीस अधीक्षक वाशिम यांना पथक तयार करून कार्यवाही करण्याची सुचना दिली.
त्याप्रमाणे पथक तयार केले सदर पथकाने पोस्टे कारंजा ग्रामीण हददीतील ग्राम तपोवन शिवारात जावून दुरुन खात्री केली असता शिवनेरी धाब्यामागे एका शेतात बरीच लोक गोलाकार बसून पैश्याची बाजी लावून हारजितचा जुगार खेळ खेळतांना दिसल्याची खात्री होताच दोन पंचासमक्ष जुगार रेड केली असता सदर ठिकाणी पैश्याची बाजी लावून हारजितचा जुगार खेळणारे व वरली मटका घेणारे एकुण ०७ इसमांना पकडण्यात आले. त्यांचेकडुन वरली मटकाचे सट्टापट्टीचे साहित्यासह एकुण नगदी १,५८,६१०/-रुपये व २५ मोटार सायकली किं.
८,६०,०००/- व ५ मोबाईल किं.४८०००/- व इतर साहित्यासह असा एकुण १०,६९,९७५/-रुपयाचा माल मिळून आल्याने घटनास्थळी सविस्तर पंचनामा करुन जप्त करण्यात आला.
या प्रकरणी एकुण ०७ व इतर इसमांविरूध्द पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम कायदयाच्या कलम १२(अ) सहकलम १०९ भादवी अन्वये गुन्हे नोंदविण्यात आला आहेत.
ऊपरोक्त कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक श्री गोरख सुरेश भामरे, सहायक पोलीस निरीक्षक श्री भारत लसंते, पोना गणेश बाजड, पोशि राजकुमार यादव यांनी केली आहे.
वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेला आवाहन करण्यात येते की, कोणालाही अवैध धंदयाबाबतची माहिती असल्यास त्यांनी अपर पोलीस अधीक्षक वाशिम यांना समक्ष भेटुन अथवा फोनद्वारे दयावी. माहिती देणा-याबाबत पुर्णपणे गोपनियता ठेवण्यात येईल असे पोलिस विभागाने कळवले आहे.