वाशिम:-मंगरूळपीर शिवसेना आणी युवासेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य शहरातील गरीब गरजु लोकांना मोफत ब्लॅंकेटचे वितरण राज्याचे गृहमंञी तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंञी श्री.शंभुराज देसाई यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत आणी हस्ते करण्यात आले.
राजकारणासोबत समाजकारणाचीही जोड देत मंगरूळपीर येथील शिवसेना आणी युवासेना नेहमी समाजपयोगी ऊपक्रम राबवतात.राजकारणातुन जनहित साधत लोकांच्या हिताचे कामे करुन गरीबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणार्या मंगरूळपीर येथील शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत सेवाभावी दृष्टीकोणातुन गरजु लोकांना थंडीपासुन सरंक्षण व्हावे या सेवाभावनेतुन मोफत ब्लॅंकेटचे वितरण राज्याचे गृहमंञी तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंञी श्री.शंभुराज देसाई यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत शिवसेनेचे विवेक नाकाडे आणी शिवसैनिक सचिन परळीकर यांनी नियोजन करुन गरीबांना ब्लॅकेटचे वितरण करण्यात आले.यावेळी तालुक्यातील शिवसैनिक तसेच गरीब गरजु लोकांची ऊपस्थीती होती.