पुणे वार्ता:- दिनांक २६/०१/२०२२ रोजी दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या स्टाफसह शिक्रापुर परिसरामध्ये गस्त करत असतांना पथकातील मोसीन शेख यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कोरेगाव-भीमा गावाचे हृद्दीतमध्ये काही सराईत जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने आले आहेत त्यांच्याकडे घातक शस्त्र असण्याची शक्यता आहे.
अशी बातमी मिळाल्याने दहशतवाद विरोधी पथकाने ही माहिती शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत शेंडगे यांना कळवून शिकापुर पोलीस स्टेशनचा स्टाफ बोलावून कोरेगाव भीमा गावचे हद्दीमधुन मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे १) मनोज एकनाथ गायकवाड, वय २७ वर्षे, रा. उमरापुर, ता.गेवराई, जि.बीड सध्या रा. पेरणेफाटा, ता.हवेली, जि.पुणे २) नसीर मंझुर शेख, वय २६ वर्षे, रा.मु.पो. हनुमान मंदिर, जुनीपेठ उमापुर, ता.गेवराई, जि.बीड सध्या रा. पेरणेफाटा, ता.हवेली, जि.पुणे, ३)संभाजी शिवाजी राऊत, वय २५ वर्षे, रा. भाडगव्हाण, ता. शेवगाव, जि. अहमदनगर सध्या रा.पेरणेफाटा, ता.हवेली, जि. पुणे या तीन सराईतांना ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपी याच्याकडुन एक बनावट पिस्तूल व सुरा जप्त करण्यात आले आहे. वरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन सदर आरोपीविरुद्ध जबरी चोरी, मारहाण, आर्म अॅक्ट या प्रकारचे गंभीर गुन्हे पुणे, बीड व अहमदनगर जिल्हयामध्ये दाखल आहेत. हे सराईत गुन्हेगार महामार्गावर शस्त्राचा धाक दाखवुन मारहाण करून लुटमार करतात.
