ऐतिहासिक क्षण | 75 वर्षानंतर पहिल्यांदाच श्रीनगर येथील लाल चौकातील घंटा घरावर फडकला तिरंगा

जम्मू काश्मीर : आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या जल्लोषात मग्न आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात साजरा होत आहे, हे वर्ष देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरे केले जात आहे.दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतर पहिल्यांदाच श्रीनगर येथील लाल चौकातील घंटा घरावर तिरंगा फडकावला आहे.

या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक तरूणांसह महिला आणि लहान मुले उपस्थित होते. भारत माता की जय ! म्हणत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे आतापर्यंत श्रीनगर येथील लाला चौकातील घंटा घरावर कधीच तिरंगा फडकावला नाही. त्यामुळे आजचा दिवस हा ऐतिहासिक मानावा लागणार आहे. कलम 370 हटवल्यानंतर आणि दहशतवाद्यांवर केल्या जाणाऱ्या कारवायांमुळे श्रीनगर येथील स्थानिक युवक समोर येत आहे. भारत माता की जय म्हणत मोठ्या उत्साहात लाल चौकातील घंटा घराच्या टॉपवर तिंरगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायलं.दरम्यान प्रजासत्ताक दिनाचा पारश्वभूमीवर काश्मिरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

श्रीनगरच्या शेर ए काश्मिर स्टेडिअममध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे. श्रीनगरसह संपूर्ण काश्मिरमध्ये सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. काही ठिकाणी शार्प शूटर देखील तैनात करण्यात आले होते. रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे नजर ठेवली जाते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!