अमरावती प्रतिनिधी – महेश बुंदे
भारतीय विद्या मंदिरद्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती, राष्ट्रीय सेवा योजना राज्यशास्त्र विभागद्वारा राष्ट्रीय मतदार दिवस संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, प्रमूख उपस्थिती डॉ. प्रशांत विघे,राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना व्यासपीठावर उपस्थित होते.

सर्वप्रथम डॉ.प्रशांत विघे यांनी राष्ट्रीय मतदान दिवसाची माहिती देऊन प्रतिज्ञा दिली. त्यामध्ये “आम्ही, भारताचे नागरिक,लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य दाखवा व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश,जात,समाज,भाषा या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करू” अशी शपथ देण्यात आली.
