अंजनगाव तालुक्यातील कोकर्डा मंडळातील १३ गावातील पात्र लाभार्थींना मुंग व उळीद पिकाची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी गावकऱ्यांच्या वतीने झेंडा चौकात सुरू असलेल्या उपोषणाची लिंबू पाणी देऊन सांगता करण्यात आली. तंटामुक्ती अध्यक्ष तथा माजी सरपंच श्रीकृष्ण पाटील सावरकर यांच्या नेतृत्वात शेतकरी बांधव उपोषणाला बसले होते.
माजी आमदार रमेश बुंदीले, नायब तहसीलदार बोबडे, मंडळ अधिकारी मीरगे यांनी शासनाकडे उर्वरीत निधी मागणीचे पाठपुरावे दाखवुन व तातडीने निधी प्राप्त करून, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.
या प्रसंगी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदु काळे, शेतकरी कीसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुधीर गोळे उपस्थित होते. मा पं स सभापती सौ. प्रीयंकाताई दाळू, कृषी अधिकारी पंचायत व ग्राम विकास आधिकारी वडतकर, उपोषण मंडपात लेखी आभिप्राय देऊन गेले होते.