तोंगलाबाद येथील आंदोलनकर्त्या कुटूंबाना भेट देऊन घराची केली पाहणी ,जि.प.आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी मोक्का पाहणी करण्याची दिली होती सूचना
दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांत मागील पाच महिने आधी राज्य व केंद्र शासन पुरस्कृत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची ‘ड’ यादी प्रकाशित करण्यात आली होती. यामध्ये तालुक्यातील तालुक्यातील तोंगलाबाद येथील ७९ गरजू नकुटुंब या घरकुल योजनेसाठी अपात्र ठरले आहेत.
यामधील अन्नपूर्णा हरिदास काळदाते,कांताबाई संतोष बीजवाडे,लक्ष्मीबाई सहदेवराव चव्हाण या तीन कुटुंबानी दि २६ जानेवारी २०२२ “प्रजासत्ताक दिनी” ग्रामपंचायत समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनाच्या द्वारे प्रशासनाला दिला आहे.
या आंदोलनाची दखल घेत अमरावती जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांची भेट घेत या कुटूंबाना न्याय मिळावा यासाठी मोक्का पाहणी करून त्याची सत्य परिस्थिती पहा अशी सूचना केली होती. त्यामुळे दर्यापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांनी दि २५ जानेवारी रोजी तोंगलाबाद येथील या तीन कुटूंबांना भेट दिली व घराची पाहणी केली. सदर कुटूंबाच्या घराची परिस्थिती गंभीर असून त्याना घरकुल योजनेचा लाभ मिळण्याची नितांत आवश्यकता आहे, तरी शासन स्थरावर आम्ही पूर्ण प्रयत्न करून आपल्या कुटूंबाना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन त्यानी यावेळी दिले.
तसेच आपण प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा जो इशारा दिला तो मागे घ्यावा अशी विनंती केली त्यामुळे गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने आत्मदहन आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे या कुटूंबानी यावेळी सांगितले. पण आमच्या कुटूंबाना लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्या अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू या आंदोलनकर्त्यानी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांच्या समवेत विस्तार अधिकारी गोहत्रे,माहुली धांडे ग्रामपंचायत उपसरपंच सतीश साखरे,संदीप कडू,पंचायत समिती ऑपरेटर किशोर वाकपांजर,दत्ता सवळे,ग्रामसेवक विलास यादव,गावातील संतोष ठाकरे,हरिदास काळदाते,केशव बीजवाडे,संतोष बीजवाडे,बाबुराव गायगोले, धनंजय देशमुख,ग्रामपंचायत ऑपरेटर उमेश बायस्कार व गावकरी उपस्थित होते.