पिंपरी-चिंचवड वार्ता:- दिनांक २३/०१/२०२२ सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवैधरित्या शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखुजन्य गुटख्याची साठवणुक करून विक्री करणा-या इसमांविरुध्द कारवाई केलेबाबत.मिळालेल्या माहितीनुसार
मा.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक २२/०१/२०२२ रोजी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायदयासाठी
शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखुजन्य गुटख्याची न्यु हनुमान ट्रेडर्स या नावचे दुकानामध्ये व सॅन्ट्रो कार एम.एच ०२ जे.पी. ३१७८ हिचेमध्ये साठवणुक करून थेरगाव, वाकड परिसरात विक्री करणा-या इसमांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक २१/०१/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवर्धन सहकारी संस्था मर्यादित सर्वे नं. १९/१/१५ साईकृष्ण पार्क, डांगे चौक थेरगाव पुणे या बिल्डींगमधील शॉन नंबर २ मधील न्यु हनुमान ट्रेडर्स चा मालक नागे महेंद्र भाटी हा त्याचे नावचे दुकानामध्ये व सैन्ट्रो कार एम.एच ०२ जे.पी. ३१७८ हिचेमध्ये साठवणुक करुन शेरगाव, वाकड परिसरात विक्रीसाठी हनुमान ट्रेडर्स या जाणार आहे.
अशी गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहितीवरून सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व •पोलीस अमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत गोवर्धन सहकारी संस्था मर्यादित सर्वे नं. १९/१/१५ साईकृष्ण पार्क डांगे चौक थेरगाव पुणे या बिल्डींगमधील शॉन नंबर २ येथे सापळा रचुन १४/२० वा चे सुमारास छापा टाकुन दोन्ही ठिकाणी खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मिळुन आला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
१) ७९०/- रु रोख रक्कम २) १,१४,४१३/- रु कि चा शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखुजन्य गुटखा ३) १,५०,०००/-रुकि.ची सैन्ट्रो कार एम. एच ०२ जे. पी. ३१७८ असा एकुण २,२५.२०३/- रु कि चा मुद्देमाल मिळुन आला
म्हणुन इसम नामे १) महेंद्र पनाराम भाटी वय २६ वर्षे रा सर्वे नंबर १८/८ शिव कॉलनी, गणेश नगर वाकड पुणे (गुटखा मालक) याचे विरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे गुरनं ५६ / २०२२ भादवि कलक ३२८, २७२,२७३,१८८ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन करीत आहे.