अवैधरित्या स्पासेंटरच्या नावाखाली ७ मुलींकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या इसमावर कारवाई ; सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची कामगिरी

पिंपरी-चिंचवड वार्ता:- दिनांक २५/०१/२०२२” सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवैधरित्या स्पा सेंटरच्या नावाखाली ०७ मुलींकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या इसमावर कारवाई केलेबाबत मिळालेल्या माहितीनुसार

पहा कारवाईचा व्हिडिओ

मा. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंयावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक २४/०१/२०२२ रोजी वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या स्पा सेंटरच्या नावाखाली जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक २४/०१/२०१२ रोजी सुमारास वाकड पोलीस स्टेशन हद्दीत ओझोन स्प्रिंग बिल्डिंग महिला मजला, प्लॅट नं. १०५,९०६, डांगे चौक, लिंक रोड, वाकड, पुणे येथील ELEMENTS THE FAMILY SPA सेंटरचा मालक नाम शुभांकर जवाजीवार व रत्नप्रभा बत्तीसे (स्पा सेंटर मॅनेजर) हे त्यांच्या स्पा सेंटरमध्ये गुर्लीकडुन जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतात वेश्यागमनासाठी स्पाचा मालक व मॅनेजर प्रतिग्राहक २५००/- घेतात व त्यातून मुलींना वेश्यागमनाचा मोबदला म्हणून प्रत्येकी ५००/- रु. देवून वेश्याव्यवसाय चालवितात

अशी गुप्त बातमीचारकडून मिळालेल्या माहितीवरून सामाजिक सुरक्षा पथक व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत सायंकाळी ७.३० वा. सुमारास स्पा सेंटरमध्ये डिकॉय कस्टमर पाठवुन वेश्या व्यवसाय चालतो अशी खात्री होताच

सापळा रचून सायंकाळी साडे पाच वा. छापा टाकुन वेश्यागमनाकरीता स्वीकारलेल्या रक्कमेसह त्यांना ताब्यात घेवुन एकुण सात पिडीत मुलींची, त्यामध्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल, नागालॅन्ड, अरुणाचल प्रदेश, आसाम, या परराज्यातील ०५ मुली व राज्यातील ०२ मुली अशा एकुण ७ मुलींची वेश्यागमनातुन सुटका करण्यात आली .

असुन त्यांना महिला सुधारगृह हडपसर, पुणे येथे ठेवण्यात आले आहे.व खालील मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त केला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.

१)१९,९००/- रोख रक्कम
२) ५,०००/- रु.कि.चा एक अँड्रॉइड मोबाईल जु.वा किअं
३)२०/-रु.कि.चे इतर साहित्य

एकुण १४,२२०/- किंचा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन ELEMENTS THE FAMILY SPA सेंटरचा चालक मालक अटक आरोपी १) शुभांकर महेश जवाजीवार, (स्पा मालक) वय २० वर्षे, रा. ५१२ जुना बाजार, खडकी, पुणे. २) रत्नप्रभा मोतीलाल बत्तीसे (स्पा मॅनेजर) वय ४३ वर्षे, रा. काळेवाडी फाटा, शिवरत्न हॉस्पिटल जवळ, वाकड, पुणे मुळ रा धरणगाव, ता. एरंडोल, जि. जळगाव यांचेविरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ मे कलम ३.४.५ भादंवि कलम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन करीत आहे.
अटक आरोपी हे दिनांक २७/०१/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी मध्ये आहेत..

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सो मा अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सो मा. उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, खो मा, सहा पोलीस आयुक्त डॉ प्रशांत अमृतकर, सो यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र बासमोन, डॉ अशोक डोंगरे पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पो.उपनि धैर्यशिल सोळंके, पो.हवा किशोर पढेर,पो.हवा संतोष बर्गे, पो.हवा सुनिल शिरसाट, पो.हवा नितीन लोंढे, पो.हवा स्वप्निल खेतले ,पो.ना भगवता मुर्त, पो.ना अमोल साडेकर, पो.ना गणेश कारोट, मोना मारुती करचुडे, पो.ना जमोल शिंदे, पोना दिपक शिरसाट, म.पोश संगिता जाधव, पो.शि अतुल लोखंडे, सुमित ढगाळ ,पो.शि सोनाली माने यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!