चाकण वार्ता :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कोरोना विषाणूचा तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपल्या गावातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र करंजविहीरे यांच्या वतीने व स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका व शेखर श्रीराम घोगरे (मा. नगराध्यक्ष चाकण नगरपरिषद) व मित्रपरिवार यांच्या सौजन्याने
सोमवार दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी चाकण प्रभाग क्रमांक 9 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी कोरोना लसीकरण मोहीम सकाळी10 ते 5 वेळेत आयोजित करण्यात आली .

या वेळी नागरिकांना या ठिकाणी, कोव्हीशिल्ड लसीचे पहिला, दुसरा, बुस्टर डोसची कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली.चाकण मधील सर्व नागरिकांनी तसेच परिसरातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून एकुण 528 नागरिकांचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात आले.

यात 18 ते 44 वयोगटातील 1st डोस – 106 , 18ते44 वयोगटातील 2nd डोस – 201, 45 ते 59 वयोगटातील 1st डोस- 65, 45 ते 59 वयोगटातील 2nd डोस – 119 ,60 वर्षापुढील 1st डोस- 7 ,60 वर्षापुढील 2nd डोस- 30 अशा प्रमाणे लसीकरण पार पडले.

कोरोनाचा प्रसार सगळीकडे होत आहे. त्यामुळे चाकण मधील सर्व नागरिकांनी या आजारापासून स्वतःचा व इतरांचा बचाव करण्यासाठी सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
लसीकरणाच्या माध्यमातून या आजाराची जोखीम कमी होत असल्याने सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून स्वतःला सुरक्षित करावे असे यावेळी बोलताना शेखर श्रीराम घोगरे (मा. नगराध्यक्ष चाकण नगरपरिषद) यांनी यावेळी सर्वाना आवाहन केले.

