संत अच्युत महाराज यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद – दत्ता पाटील कुंभारकर ; कौशल्या देवी मालपाणी ट्रस्टचा अभिनव उपक्रम
दर्यापूर – महेश बुंदे
कौशल्या देवी मालपाणी ट्रस्टच्या वतीने श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य वर अंध अपंगांना किराणा साहित्याचे वाटप दर्यापूर येथील सेवाभावी काम करणारी संस्था म्हणजे कौशल्या देवी जगन्नाथ सेठ मालपाणी ट्रस्ट असून ट्रस्टच्या वतीने दर्यापूर आतील आकोट रोड स्थित राम टाईल्स च्या प्रांगणात श्री संत अच्युत महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून परिसरातील अंध अपंग व गरीब लोकांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले या साहित्याचा लाभ बावीस अंध अपंगांना देण्यात आला.
दर्यापूर मालपाणी ट्रस्टचे अध्यक्ष रामेश्वर मालपाणी, श्याम शेठ मालपाणी, गाडगेबाबा मिशन मुंबईचे संचालक गजानन देशमुख, सामाजिक कार्यकर्ते तथा युवा एकता सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील कुंभारकर, सामाजिक युवा कार्यकर्ते महेश बुंदे, पावर ऑफ मीडिया तालुकाध्यक्ष शशांक देशपांडे, नामदेवराव उटाळे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित १५ अपंग व गरीब लाभार्थ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. कौशल्या देवी मालपाणी ट्रस्ट द्वारा प्रतिवर्षी गोरगरीब अंध अपंग आदींना सेवाभावी पद्धतीने मदत करण्यात येते या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत सुद्धा या ट्रस्ट द्वारे केली जाते. श्री संत अच्युत महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी संत अच्युत महाराज यांचे सेवाकार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन दत्ता पाटील कुंभारकर यांनी व्यक्त करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला अंध अपंग गरीब महिला व पुरुष यांच्यासह परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.