सोमवार दिनांक 24/01/2022 रोजी चाकण शहर भारतीय जनता पार्टी चे कार्यअध्यक्ष किशोर बाळासाहेब भुजबळ यांचे चि.कु.अथर्व किशोर भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री साई लोकसेवा प्रतिष्ठान व किशोर भुजबळ युवा मंच भुजबळ आळी यांच्या संयुक्त विद्यमाने व माननीय अतुलभाऊ देशमुख मित्र परिवार यांच्या सौजन्याने चाकण शहरातील ग्रामस्थांसाठी मोफत कोविड लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

लसीकरण व हेल्थ चेकअप श्री बोलाई माता मंदिर भुजबळ आळी, या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते .

यावेळी भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजनभाई परदेशी परदेशी, ज्येष्ठ पदाधिकारी अमृत शेवकरी ,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे, अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाबनाना खांडेभराड, प्रभाग क्रमांक 21 चे विद्यमान नगरसेवक प्रकाश भुजबळ, महेश लांडगे स्पोर्ट फाउंडेशन चे सदस्य गणेश गोरे भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे, भाजपा तालुका सरचिटणीस ऍड.प्रितम शिंदे पा., महिला मोर्चा खेड तालुका अध्यक्षा ऍड. सौ मालिनीताई शिंदे, सा.कार्यकर्त्या सौ. हर्षदा भुजबळ ,सौ.आरती भुजबळ, शहराध्यक्ष चाकण शहराध्यक्ष अजय जगनाडे, दिव्यांग आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष लहू लांडे पाटील, अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे शहराध्यक्ष .गणेश उंबरे, युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव, बजरंग दल चाकण शहर संयोजक मनोज देशमुख, चाकण शहर उपाध्यक्ष जितेंद्र सोनवणे, शहर उपाध्यक्ष मोतीलाल बाविस्कर भाजपा चाकण शहर सरचिटणीस अरुण जोरी, चाकण शहर कार्याध्यक्ष किशोर भुजबळ,सा.कार्यकर्ते अभिजीत सोनावळे, मोहन भुजबळ, गोपीनाथ खुर्पे, विलास लोखंडे, चाकण शहर हातगाडी पथारी चे अध्यक्ष दीपक नवसारी,.सुरेश भुजबळ ,तुषार खळदकर, सा.कार्यकर्ते गोपीनाथजी खुरपे सा.कार्यकर्ते मोहन भुजबळ ,बोलाई माता मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते भुजबळ आळीतील सर्व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी . राजनभाई परदेशी , मनोज मांजरे . गुलाब खांडेभराड ,अमृत शेवकरी, नगरसेवक प्रकाश भुजबळ यांनी अथर्व यास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
त्याच प्रमाणे चाकण शहर अध्यक्ष अजय जगनाडे यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम आयोजक किशोर बाळासाहेब भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी कोवॅक्सिंन ऑन व्हील्स प्रेश डायबिटीज
केअर चे डॉक्टर बनकर सर व त्यांचा पूर्ण स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी दोनशे लोकांनी कोविड लसीकरणाचा व आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.