प्रतिनिधी रविकांत जाधव /चाकण
कोरोनाचा प्रसार सगळीकडे होत आहे. त्यामुळे नागरिकांनी या आजारापासून स्वतःचा व इतरांचा बचाव करण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. लसीकरणाच्या माध्यमातून या आजाराची जोखीम कमी होत असल्याने सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून स्वतःला सुरक्षित करावे.असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नितीन सुभाष वाव्हळ यांनी केले.
कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी यंग जॉली क्लब चाकण,सा.का.नितिन वाव्हळ मित्र परिवार ,सा.का.किशोर जगनाडे मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.
पुणे वार्ता:- खेड तालुक्यातील चाकण मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कारंजविहिरे यांच्या वतीने , करंजविहिरे आरोग्य अधिकारी डॉ मकसुद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली,आरोग्य अधिकारी सोनवणे सर, सुर्वे मॅडम, स्मिता मॅडम, ऋतुजा टिंगरे, सुरेखा मेदनकर यांच्या सहकार्याने व यंग जॉली क्लब चाकण यांच्या व्यवस्थापनेतून 24 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 5या वेळेत ईगल बालक मंदिर,शनी मंदिर जवळ, बाजारपेठ, चाकण या ठिकाणी, कोव्हीशिल्ड लसीचे पहिला, दुसरा, बुस्टर डोस ची लसीकरण मोहीम कोरोना नियमांचे पालन करून राबविण्यात आली. प्रभागातील सर्व नागरिकांनी, क्रमाने प्रभाग 18, 19 तसेच परिसरातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून एकुण 500 नागरिकांचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख सहकार्य युवा सामाजिक कार्यकर्ते नितीन सुभाष वाव्हळ (सचिव लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर), अनिल जगनाडे (अध्यक्ष यंग जॉली क्लब),राजेश जगनाडे(उपाध्यक्ष), संतोष वाव्हळ, संतोष पन्हाळे, गौरव डंबीर, विशाल गंभीर,ऋषिकेश वाव्हळ,विश्वनाथ बिरदवडे, अक्षय गंभीर,
निखील डंबीर, बंटी वाव्हळ, अनिकेत गायकवाड,किरण शेलार,स्वप्निल बारमुख,संदीप जगनाडे (पोलिस मित्र), आदेश जगनाडे,संदेश जगनाडे, हर्षद हुलावळे, चिन्मय वाव्हळ, अनुप वाव्हळ, युवराज बांबळे ,अमित पाचोरे,जितेंद्र घाटकर,योगेश डोंगरे ,किरण शेलार ,मंगेश जगनाडे, सुदर्शन जगनाडे इत्यादी तसेच
यंग जॉली क्लब चाकण. मंडळाचे सर्व कार्यकर्ते, नितीन वाव्हळ मित्र परिवार ,तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर जगनाडे मित्र परिवार आदी उपस्थित होते.


