प्रतिनिधी नीरज शेळके/ठाणे
ठाणे: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका शिक्षणक्रम पदविका वितरण समारंभ आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालय ठाणे येथे नुकतेच संपन्न झाले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ज. ढवळ हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदविका प्रदान तसेच ‘रक्षक न्यूज’चे संचालक सतिष एस राठोड यांच्या वतीने “कोरोना योद्धा सन्मानपत्र” देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा. शैलेश कसबे यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना नोकरीच्या दिशेने वाटचाल आणि स्वावलंबी होण्यासाठी विविध उपाय सुचवले. विद्यार्थांनी स्वत:ची कार्यक्षमता ओळखून योग्य त्या क्षेत्रात नोकरी करावी व समाजाला समस्यामुक्त करण्याचा प्रयत्न करावा, असे म्हणत विद्यार्थांनी आपले महाविद्यालयाशी असेच ऋणानुबंध जोपासावे असे आवाहन केले. तसेच पत्रकारिता या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून जनसंपर्क विभाग (पब्लिक रिलेशन PR) मध्ये पण चांगले करिअर घडवू शकता असे मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रा. शशिकांत कोठेकर यांनी आनंद विश्व गुरुकुल व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आनंद विश्व गुरुकुल येथे शिक्षण घेण्यासाठी अनेक डिग्री कोर्सेस सुरू केल्याची माहिती दिली. पदविका आणि पदवी बरोबरच जबाबदारीची जाणीव बाळगणे हे देखील महत्त्वाचे असल्याचे सांगितले, व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दूरदर्शनचे माजी डायरेक्टर श्री. जयु भाटकर यांनी देखील विद्यार्थ्यांना महत्वाचे मार्गदर्शन केले, व शुभेच्छा दिल्या.आनंद विश्व गुकुकुलच्या केंद्र प्रमुख प्रा.डॉ. हर्षला लिखिते यांनी देखील छान प्रकारे मार्गदर्शन केले असून आनंद विश्व गुरुकुल येथे अनेक कोर्सेस उपलब्ध झाले असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आवाहन केले.
प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयातील सर्व घटकांच्या सहकार्याने विद्यार्थी प्रगती पथावर वाटचाल करीत असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील विद्यार्थांवर आपल्याला अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात होणाऱ्या पदविका व पदवी वितरण समारंभाची संकल्पना पटवून दिली. त्यांनी आनंद विश्व गुरुकुल व विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थांना उत्कृष्ट अभ्यासक्रमाची आखणी करून त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील जीवनात यशप्राप्तीसाठीचा मार्ग मोकळा व्हावा असे कार्य घडावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच पदविप्राप्त विद्यार्थांना उज्ज्वल भवितव्य व भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
प्रमुख उपस्थिती म्हणून शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ज. ढवळ, दूरदर्शनचे माजी डायरेक्टर श्री. जयु भाटकर, आनंद विश्व गुकुकुलच्या केंद्र प्रमुख प्रा.डॉ. हर्षला लिखिते, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शाखा अध्यक्षा सौ. कुलकर्णी, केंद्र संयोजक श्री. शशिकांत कोठेकर व मार्गदर्शक म्हणून प्रा. शैलेश कसबे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. प्रमिला पवार यांनी व सूत्रसंचालन प्राची म्हात्रे तसेच आभार प्रदर्शन श्री. संतोष पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्र सहाय्यक श्री. आकाश ढवळ सर, चेतन परब सर आदींनी परिश्रम घेतले.