विविध क्षेत्रातील मुलींचा मान्यवरांच्या हस्ते झाला सत्कार
दर्यापूर – महेश बुंदे
महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत तालुका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्या वतीने दर्यापूर पंचायत समिती येथील सभागृहात दि. २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय कन्या दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या निमित्ताने दर्यापूर तालुक्यातील महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या महिलांचा व विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मुलींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले,प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी सुधीर अरबट, गटशिक्षणअधिकारी वीरेंद्र तराळ, प्रकल्प अधिकारी प्रशांत अढावू, पर्यवेक्षिका खेडकर मॅडम, घूरडे मॅडम, राऊत मॅडम, नवले मॅडम, नागनाथ ईप्पर, प्रशांत तांबडे, सतिष रामकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत “बेटी बचाओ-बेटी पढाओ या योजनेची तालुका चॅम्पियन म्हणून कु.मनीषा निवृत्ती दुदंडे यांची निवड करण्यात आली. यावेळी त्याचा गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्या जीवन विकास संस्था, तालुका समन्वयक म्हणून एकल, विधवा, महिला पुनर्वसन क्षेत्रात स्वयंसेवी संस्था तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
तसेच राष्ट्रीय स्केटिग खेळाडू कु.सलोनी संदिपसिंह सोलंकी, राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत खेळलेली युक्ता अनिल नाचणे, राज्यशास्ञ विषयात डाॅ. कुसुमताई कोरपे सुवर्ण पदक प्राप्त करणारे सुजाता गजानन गोंडचर, तायकांडो स्पर्धेत राज्यस्थरीय सहभागी तेजश्री विनोद टाले, वक्तृत्व स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेली स्नेहल देवदास शेंडोकार, राष्ट्रीय योगापटू साक्षी नंदकिशोर रायबोले,राज्यस्तरीय योगापटू श्रध्दा विठ्ठलराव जउळकार, संस्कृत विषयात प्राविण्य मिळवलेले तन्वी गावंडे, बचतगटाचे छाया निचळ, नीट परीक्षा प्राप्त पूर्वी निंबाळकर, राष्ट्रीय कबड्डी पटू श्रावणी वाठ, कार्यक्रम प्रसंगी बेटी बचाव-बेटी पढाओ रांगोळी काढणारी मनस्वी प्रशांत तांबरे, प्रोत्साहनपर अशिंका हीरुळकर, साक्षी पिंजरकर याचा यावेळी पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दर्यापूर पंचायत समितीचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस पालकवर्ग आदी उपस्थित होते. या प्रसंगी अंगणवाडी सेविका सौ.थोरात मॅडम यांनी स्त्रीभ्रूणहत्या यावर सुंदर असे गीत सादर केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकल्प अधिकारी प्रशांत अढावू यांनी केले तर संचलन मालाताई डोईफोडे व आभार प्रदर्शन सुनिता राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती महिला व बालकल्याण विभाग कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहकार्य केले.अल्पाहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.