काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

मुंबई वार्ता- : काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.यानंतर नानांवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. हा वाद शमतो न शमतो तोवर नानांनी आता मोदींबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे नाना पटोले पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.


नाना काय म्हणाले?
“ज्याची बायको पळते त्याला मोदी म्हणतात”, असं नाना पटोले यांनी म्हंटलंय. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोडं फुटलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते. या विधानावरुन नानांवर भाजपकडून सडकून टीका केली जात आहे. नाशिकमधील इगतपुरीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेदरम्यान मुंबई काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.असं वक्तव्य नाना पटोले यांनी केल्यानंतर त्यांची दुसरी क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काय म्हणाले नाना पटोले ?

देशाची बेराजगारी आणि महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालंय. शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. छोटे उद्योजक आणि व्यापारांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. केंद्रातील सरकार फेल झालेलं सरकार आहे. ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं असं हे झाल्यानंतर काय बाकी राहीलेलं आहे, असं नाना पटोले म्हणाले.

दरम्यान आता नाना पटोले यांच्या या वादग्रस्त विधानानंतर भाजप काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय.

या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण करण्याची आणि शिव्या देण्याची धमकी दिली. हा प्रकार अंगलट आल्यानंतर त्यांनी आपण पंतप्रधान नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोलल्याची सारवासारव केली. त्यानंतर एक कथित गावगुंड पत्रकारांसमोर आला. त्या कथित गावगुंडाने पत्रकारांशी बोलताना जे सांगितले त्याच प्रकारे नाना पटोले आज बोलले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एका दारुड्या गावगुंडासारखे बोलत आहेत, हे धक्कादायक आहे. आपण याचा निषेध करतो.

मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या घाणेरड्या टिप्पणीमुळे त्यांना न्यायालयासमोर जाब द्यावा लागला. नाना पटोलेही त्यांच्या नेत्याच्या मार्गावरून चालले आहेत. पटोले यांनी कारवाईला तयार रहावे, नंतर ‘तो मी नव्हेच’ असा पळपुटेपणा करू नये, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

नाना पटोलेंना आम्ही सोडणार नाही

ज्यांची बायको पळून जाते त्याला मोदी म्हणतात असं वक्तव्य करणाऱ्या पटोलेंचं डोकं फिरलं असून त्यांना नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे. संपूर्ण काँग्रेस पार्टी आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. तसेच नाना पटोलेंना आम्ही सोडणार नाही, असा इशारा बावनकुळेंनी दिलाय.

ज्यांची बायको पळून जाते त्याला मोदी म्हणतात असं म्हणत त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. पीएम मोदींबाबत ते अतिशय वाईट बोलले असून आम्ही त्यांना सोडणार नाही. तसेच महाराष्ट्रभर आम्ही नाना पोटोलेंच्या पुतळ्याचं दहन करणार आहोत, असं देखील बावनकुळे म्हणाले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!