स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे :-
पुणे – खेड तालुका बार असोसिएशन, विधी सेवा समिती खेड, हंबीरराव मोहिते लॉ कॉलेज यांच्या संयुक्त आज 19 ऑक्टोंबर 2021 रोजी श्री क्षेत्र निमगाव खंडोबा या ठिकाणी कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित आयोजित केले होते. सदर कार्यक्रमाचा शुभारंभ खेड न्यायालयाच्चे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एम.अंबाळकर आणि खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट देविदास युवराज शिंदे, निमगाव गावचे सरपंच अमर शिंदे पाटील, महाराष्ट्र राज्याचे पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र खंडोबा यांच्या प्रतिमेस हार घालू व दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृत मोहस्तव निमित्त अनेक ठिकाणी शासन स्थरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन हे तालुका स्थरावर केले जात आहे.
खेड तालुका बार असोसिएशन, विधी सेवा समिती खेड, हंबीरराव मोहिते लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हे कायदेविषयक शिबिराचे आयोजन गावोगावी केले जात आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना गावोगावी जाऊन कायदेविषयक माहिती दिली जात आहे. आज खेड तालुक्यातील श्री क्षेत्र निमगाव खंडोबा
या गावामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात अंकिता शिंदे विधी स्वयंसेवक यांनी युटिलिटी सर्विसेस, एडवोकेट प्रदीप उमाप पाटील यांनी सातबारा, एडवोकेट रामदास घोलप यांनी महिलांचे मालमत्तेतील हक्क व अधिकार, एडवोकेट पोपटराव तांबे पाटील यांनी पावर ऑफ अटॉर्नी, एडवोकेट नामदेवराव वाडेकर यांनी पब्लिक युटीलिटी सर्विसेस, या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण: मा श्री.ए.एम अंबाळकर साहेब यांनी केले सदर भाषणात साहेबांनी सदर शिबिराचा मुख्य उद्देश कायदे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि तळागाळातील जनतेपर्यंत सदर कायदे पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता कायद्याबाबत साक्षर होतील असे प्रतिपादन केले , सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन: माजी सरपंच बबनराव शिंदे पाटील यांनी केले.
