स्मरण आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे !
स्मरण सामान्य माणसाच्या असामान्य शक्तीच्या योगदानाचे !!
निमित्त स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अमरावती जिल्ह्यात अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी नुकतीच अमरावती येथे प्राथमिक बैठक पार पडली.
श्री विजय राऊत , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व श्री राज ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच अमरावती बायो ॲनिमेशन अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
