प्रतिनिधी नीरज शेळके (ठाणे):-
ठाणे वार्ता :- आज दिनांक. 20 ऑक्टोबर 2021 रोजी, ठाणे महानगरपालिका आणि आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीड प्रतिबंधात्मक विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेचे उद्घाटन ठाणे शहराचे प्रथम नागरिक व महापौर श्री नरेशजी मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात नगरसेवक श्री विकास रेपाळे, ठाणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य सौ.नम्रता भोसले हे मान्यवर उपस्थित होते.

त्याचप्रमाणे कार्यक्रमात शारदा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री विलास ठुसे, सचिव डॉ.प्रदीप ढवळ, खजिनदार. श्री अक्षर पारसनीस विभागीय प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ठाणे महानगरपालिकेचे सर्व डॉक्टर व कर्मचारी,पत्रकार मित्र आणि विद्यार्थी उपस्थित होते. ही लसीकरण मोहीम सलग पुढील तीन दिवस महाविद्यालयामध्ये राबवण्यात येईल.

दररोज किमान पाचशे विद्यार्थी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतील,त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन आणि मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांचे नियमित ऑफलाईन लेक्चर्स 20 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये घेण्यास परवानगी दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एकही डोस घेतलेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन लेक्चरची सुविधा पुरवण्यात येत आहे.
