दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील वर्ग खोलीचे ९.५० लक्ष रुपये बांधकाम, खोली दुरुस्ती ४ लक्ष रुपये आणि शाळेला कंपाउंड बांधकाम १० लक्ष रुपयांचे अशा विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या निधीतून दि. २२ जानेवारी रोजी संपन्न झाले. तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील इमारतीचे भूमिपूजन सुद्धा यावेळी संपन्न झाले.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे उपस्थित होते. तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, जेष्ठ नागरिक अण्णासाहेब देशमुख, रामतीर्थ ग्रामपंचायत सरपंच प्रियंका मोटे, अमरावती जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष सुनील पाटील गावंडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देशमुख, जेष्ठ पत्रकार गजानन देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
