गेली दोन वर्षापासून कोरोना या जीव घेणाऱ्या महामारीने ते साऱ्या जगात धुमाकूळ घातला असून मागील काही दिवसापासून वातावरणात मोठे बदल होऊन महाराष्ट्रामध्ये झालेल्या गारपिटीने थंडी व धुवारीची लाट पसरली आहे .
म्हणून यामुळे सर्दी, खोकला, ताप या सारख्या अनेक आजार वाढले आहेत तरी नागरिकांनी वेळीच काळजी घ्यावी लागेल असे आवाहन कोकर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय डॉ. रोशन खोरगडे यांनी केले आहे. वातावरणात मोठे बदल होऊन थंडीची लाट पसरली आहे.