आ.बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते व जि.प.सभापती बाळासाहेब हिंगणीकर अध्यक्षतेखाली संपन्न
दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील सौंदळी हिरापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन खोल्या असणाऱ्या इमारतीचा लोकार्पण सोहळा दि. २२ जानेवारी रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून दर्यापूरचे आमदार बळवंतराव वानखडे उपस्थित होते तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, गोळेगाव-सौंदळी ग्रामपंचायत सरपंच भारतीताई विक्रम देशमुख, अमरावती जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष सुनील पाटील गावंडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देशमुख, प्रा. डॉ. देवलाल आठवले, गजानन देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
