पिंपरी चिंचवड वार्ता:- दिनांक २०/०१/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे सपोनि श्री. डॉ. अशोक डोंगरे यांना यवतमाळ पोलीसांकडून माहिती मिळाली की, औषधांच्या गाड्यांचा पाठलाग करून रोड रॉबरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दरोडेखोरांची टोळी शिळफाट्याकडून पुण्याच्या दिशेने महिंद्रा कंपनीच्या XUV 500 या दोन मोटार वाहन क्रमांक एम.पी. ०४ सी.एन. ९४८४ आणि एम.पी. ०९. डब्ल्यु. एच. १०३२ या वाहनातून येणार आहेत.
अशा मिळालेल्या बातमीची माहिती स.पोनि डॉ. अशोक डोंगरे यांनी तात्काळ मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, मा. अप्पर पोलीस आयुक्त . संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त श्री. काकासाहेब डोळे यांना सांगितली. मा. पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सुचनेनुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक . देवेंद्र चव्हाण, गुंडा स्कॉडचे प्रभारी अधिकारी सपोनि . हरिष माने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पो.उपनि . इंगळे यांना तात्काळ नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सामाजिक सुरक्षा पथकाचे सपोनि . डॉ. डोंगरे, यानी खालापुर टोलनाका येथे संपर्क साधला असता सकाळी ०९/४२ वा. संशयीत वाहने पास झाले असल्याची माहिती मिळाली.

सदर माहिती व मा. पोलीस आयुक्त सो यांचे आदेशानुसार सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उप निरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस अंमलदार किशोर पढेर, संतोष वर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोढे, भगवंता मुठे, मारुती करचुडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, मपोना संगिता जाधव तसेच गुडा स्कॉडचे विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, सोपान ठोकळ, गणेश मेदगे, सुनिल चौधरी, नितीन गेंगजे, विजय तेलेवार, रामदास मोहिते, ज्ञानेश्वर गिरी, शुभम कदम तसेच तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोउपनि श्री. संदेश इंगळे, मपोउनि श्रीमती, प्राजक्ता धापटे, पोलीस अंमलदार देवराम शेळके, सोमनाथ भोईर, गणेश दरंदले, प्रशांत वावळे व दिलीप कदम असे नाकाबंदीकरिता उसे टोलनाका येथे जावून थांबले असताना ११.५० वा. दरम्यान सिल्हर रंगाची एम.पी सी. एन. ९४८४ ही गाडी गुडा स्कॉड व सामाजिक सुरक्षा पथकातील अंमलदार यांना येताना दिसली

त्यावेळी सदर गाडी थांवण्यासाठी लेनवर बॅरिकेट्स लावले व सदर गाडी ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा केला असता चालकाना गाडी न थांबवता बॅरिकेट्स उडवुन पळुन जाबु लागला त्यावेळी स्टाफच्या मदतीने त्यांना खाली उतरवले असता स्टाफमचील अमलदारांना धकाबुबकी करु लागले असता त्यांना योग्य तो बळाचा वापर करुन गाडीमध्यील एकुण २०५ इसमांना ताब्यात घेवून चौकशी करत असताना पाठीमागुन दुसरी संशयीत गाडी एम.पी. ०९. डब्ल्यु. एच. १०३२ ही गाडी येताना दिराली तेव्हा सदर गाडीला आडवण्यासाठी चॅरिकेटरा लावून आढवण्याचा प्रयत्न केला असता गाडी चालकाने बेरिकेट्स उडवुन यु टर्न घेतला आणि गुंडा स्कॉडचे पोलीस अंमलदार शुभम कदम यांना धडक देवुन त्यांचे अंगावर गाडी घालून त्यांना २० ते २५ फुट फरपटत नेले व मुंबईचे दिशेने विरुध्द बाजुने गाडी भरधाव वेगात घेवून निघाले.

त्यावेळी वरील नमुद स्टाफने सदर गाडीचा पाठलाग चालु केला असता साधारण १ ते १.५ कि.मी. अंतरावर गाडीचालकाने गाडी थांबवली व गाडीतील सर्व इराम खाली उतरुन जवळच असलेल्या डोंगराच्या दिशेने पळाले. तेव्हा उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांनी त्यांच्या पाठीमागे डोंगराच्या दिशेने त्यांचा पाठलाग केला परंतु आरोपी डोंगरामध्ये झाडाझुडपात व कपारीमध्ये लपुन बराले असल्याने मिळुन येत नव्हते. त्यानंतर सदर ठिकाणी अपर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे, राहा पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, (गुन्हे), सहा पोलीस आयुक्त श्री. संजय नाईकपाटील, देहुरोड विभाग यांनी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार, पोलीस ठाणेचे वरिष्ठ अधिकारी व अंमलदार हे सर्व त्याठिकाणी आले व सर्व ऑपरेशन करून पळून गेलेल्या ०६ पैकी ०४ संशयीत इसमांना डोंगराच्या कडया कपारीतून व झाडाझुडपातुन शोधुन पकडण्यात आले. रात्री उशीरापर्यंत ०४ आरोपी यांना ताब्यात घेतले व रात्रभर सर्व ऑपरेशन बालु होते.
सदर कारवाईमध्ये १) लोकेश चव्हाणसिंग चौव्हाण (टोळी प्रमुख) २) अंतिम कल्याण सिसोदिया (टोळी प्रमुख) ३) कमलसिंग सदनसिंग हाडा ४) अरविंद अजानसिंग चौव्हाण ५) भवानी हाडमंत चौव्हाण ६) संजय केशरशाहू मैदन ७) बॉबी बबील धर्मराज झांजा ८) कुंदन राजु चव्हाण ९) निहालसिंग गुरुड गुदेन यांना पकडण्यात आले आहे. तसेच त्यांचे साथीदार नामे १) शांतीलाल झांजा, २) हुकुम बाबु गुदेन असे दोघेजण पाहिजे आरोपी असून त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

सदर आरोपीविरुध्द पांढरकवडा पोलीस ठाणे जिल्हा यवतमाळ गु.र.नं. १२०० / २०२१ मा.द.वि. कलम ३९५ ३९२ अन्वये गुन्हा दाखल आहे. तसेच यातील आरोपी नाम नेहाल सिंग याचेवर यवत पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गु.र.नं. १०२/२०२९ भा.द.वि कलम ३९५ ३९७३६८,५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल •सदर आरोपीविरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे अंकित शिरगाव पोलीस चौकी गु.र.नं. ३३/२०२२. भा.द.वि. कलम ३०७, ३५३३३२ २७९ सह मो. वा. का. कलम १८४४/१२२ १७७ (ए) प्रमाणे दि. २०/०१/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरगाव पोलीस चौकी करित आहेत.
