बारा वर्षीय अल्पवयीन, आदीवासी मुलीवर अनैसर्गिक अत्याचार ; माणुसकीला काळीमा फासणारी महाळुंगे इंगळे येथील घटना

महाळूंगे वार्ता :- 12 वर्षीय अल्पवयीन व आदीवासी मुलीस आरोपी योगेश साहेबराव चाटी वय ३१ वर्ष (मूळ रा.गिवा कुटे, ता-मालेगाव, जिल्हा -वाशीम ,) सध्या राहणार -महाळूंगे, ता-खेड जि-पुणे हा इसम याने माझ्या घरी कोणी नाही तर मला जेवणासाठी भाजी बनवून देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे.

खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथे दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना दिनांक १९ जानेवारी २०२२ रोजी दुपारी तीनच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन मुलींला त्याच्या राहात्या घरी भाजी बनून देण्यासाठी नेले असता

आरोपीने त्याच्या घराची दरवाजाची कडी आतून लाउन आरोपीने पीडित मूलीस त्याच्या पायाची बोटे ओढायला लावली पायाची बोटे ओढत असताना त्याने मूलीच्या डोक्याचे केस हाताने धरून तिला बळजबरीने अंगावर ओढून आरोपी योगेश ने बारा वार्षिय अल्पवयीन मुलीसोबत अनैसर्गिक अत्याचार केला.तसेच हा प्रकार कोणाला काही सांगितल्यास जीवे मारून टाकिन अशी धमकी देवुन शिवीगाळ केली त्यामुळे अल्पवयीन मुलगी घाबरलेल्या अवस्थेत होती.नंतर मुलीने रडत रडत घाबरलेल्या अवस्थेत घरातील माणसानं झालेला प्रकार सांगितला.


पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी उशिरा दि .21 रोजी दिलेल्या फिर्यादी वरून या नराधमावर बाल लैंगिक अत्याचार अन्वये व अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे.

इसम योगेश साहेबराव चाटी ( वय – ३१, मूळ रा. गिवा कुटे, ता. मालेगाव, जि. वाशीम, सध्या रा. महाळुंगे इंगळे, ता.खेड,) असे गुन्हा दाखल झालेल्या नराधमाचे नाव आहे. तर पिडीत बारा वर्षीय मुलीच्या बत्तीस वर्षीय आईने या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

तिच्या फिर्यादी वरून योगेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाळुंगे इंगळे पोलीस सहा.पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!