हिंगणी मिर्झापुरची स्मशानभूमी प्रेतांच्या प्रतीक्षेत…!

दर्यापूर – महेश बुंदे

स्थानिक हिंगणी मिर्झापुर येथील गावाच्या पश्चिम दिशेला असलेली व गावापासून जवळच असलेली स्मशानभूमी आजही प्रेतांच्या प्रतीक्षेत आहे. स्ममशानंभूमी झाल्यापासून अद्याप एकही प्रेत दहन अंत्यसंस्कार ह्या स्मशानभूमीत झाले नाही. तर इतक्यात श्री. दिलीप गावंडे यांच्या पत्नी स्व. भारती गावंडे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दिनांक २० जानेवारी २०२२ ला सकाळीच निधन झाले.

त्यांच्या अंतयात्रेत शेकडोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता, तेव्हा अनेकजण आप-आपसात कुजबुज करताना असे म्हणत होते की, गावाजवळच स्मशानभूमी असताना लोक इतक्या लांब जाऊन दहन, दफन का करतात असाही प्रश्न तेथे असलेल्या उपस्थितांना पडला होता. त्यांची ही चर्चा एकूण खरंच मनात असे येत होते की या स्मशानभूमीच्या शेडला कितीकाळ प्रेतांची वाट बघावी लागणार आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!