प्रतिनिधी ओम मोरे :-
आगामी स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाने सोपविली नवी जबाबदारी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर- संजय खोडके अमरावती २१ जानेवारी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्यावर पक्षाने नवीन जबाबदारी सोपविली आहे. संजय खोडके यांची अमरावती विभाग समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई स्थित राष्ट्रवादी भवन येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशध्यक्ष माननीय जयंतराव पाटील यांनी संजय खोडके यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांच्यावर अमरावती विभाग समन्वयक पदाची जबाबदारी सोपविली .यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते .
या नियुक्तीच्या अनुषंगाने अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांचा (अमरावती , अकोला ,शहर /ग्रामीण , बुलढाणा ,वाशीम ,यवतमाळ ) दौरा करावा व जिल्ह्यातील प्रमुख नेते , निरीक्षक , जिल्हाध्यक्ष , पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पक्ष संघटना बळकट व मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्ष संघटनेची रचना लक्षात घेऊन नियोजन करावे , अशी नवीन जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संजय खोडके यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
