दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर शहरात भव्य त्वचा रोगनिदान शिबिराचे आयोजन एकता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अकोट रोड बनोसा येथे दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपासुन ते दुपारी ५ वाजेच्या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
तरी या सर्व रोगनिदान शिबिराचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन येथील एकता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचाकल डॉ. आय. एस. पठाण यांनी केले आहे. या शिबिरात त्वचारोग तज्ञ व गुप्तरोग तज्ञ डॉ. श्वेता मोहोड (पाटील) यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवला. शिबिरात गचकरण, पिंपल्स, मस्से, केसांच्या समस्या, सोरियासीस, कुष्ठरोग, गुप्तरोग, इसबगोल, केमिकल पिलिंग,पांढरे वांग, वांग इत्यादी आजारावर उपचार केले जाईल.
प्रतिक्रिया –
अनेक डॉक्टर प्रत्येक वर्षी आपल्या तालुक्यातील गरजूंची सेवा करण्यासाठी येत असतात. या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जात असतात.
डॉ. आय.एस.पठाण
( संचालक, एकता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दर्यापूर)