तोंगलाबाद येथील ‘त्या’ अन्यायग्रस्त कुटूंबाने दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन, घरकुलाची ‘ड’ यादी प्रकाशित होताच दिले होते निवेदन, प्रशासनाने केले दुर्लक्ष
दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांत मागील पाच महिने आधी राज्य व केंद्र शासन पुरस्कृत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची ‘ड’ यादी प्रकाशित करण्यात आली होती. यामध्ये तालुक्यातील तालुक्यातील तोंगलाबाद येथील अनेक गरजू लाभार्थी या घरकुल योजनेसाठी अपात्र ठरले होते.
या करिता ग्रामपंचायत सरपंच वैशाली निरंजन पानझाडे व सदस्या ममता संतोष ठाकरे याच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी दर्यापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले होते. पण पाच महिने झाले तरी अजूनपर्यंत सुधारित घरकुल लाभार्थी यांची यादी प्रकाशित करण्यात आली नाही. त्यामुळे तोंगलाबाद येथील घरकुल योजनेपासून वंचित असणारे लाभार्थी ग्रामपंचायत सदस्या अन्नपूर्णा हरिदास काळदाते, कांताबाई संतोष बीजवाडे, लक्ष्मीबाई सहदेवराव चव्हाण या तीन कुटुंबानी दि २६ जानेवारी २०२२ “प्रजासत्ताक दिनी” ग्रामपंचायत समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनाच्या द्वारे प्रशासनाला दिला आहे.
