मंगरूळपीर तहसिलचे कर्मचारी कार्यालयीन वेळेआधीच फुर्रर्रर्र

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम:-मंगरूळपीर तहसिल कार्यालयाचा पुन्हा एकदा बेताल कारभार चव्हाट्यावर येत असल्याचे चिञ सध्या पाहावयास मिळत आहे.कार्यालयीन कामाच्या वेळेआधीच काही अधिकारी,कर्मचारी फुर्रर्र होत असल्याने सर्वसामांन्याची कामे वेळेत पुर्ण होत नाहीत.


दि.२१ जानेवारी रोज शुक्रवारला दुपारनंतर मंगरुळपीर तहसिल कार्यालयात बरेच कर्मचारी हजर नसल्याचे चिञ पाहावयास मिळाले.शनिवार रविवारला सूट्या असतात त्यामुळे शुक्रवारी दुपारनंतर कर्मचारी,अधिकारी खुर्चीवर सहसा दिसत नसल्याचे चिञ नेहमीच पाहावयास मिळते.या शुक्रवारीही दुपारनंतर सर्वञ शुकशुकाट जाणवत होता.शासकीय कामासाठी येणारे लोक या टेबलवरुन त्या टेबलवर फिरत होते परंतु काही कर्मचार्‍यांनी वेळेच्या आधी धराचा रस्ता धरल्याने लोकांना ञास सहन करावा लागला.

मिळालेल्या माहीतीनुसार सकाळी साडेदहा ते संध्याकाळी सव्वासहाची तहसिल कार्यालयाची वेळ आहे.परंतु बहुतांश महसुल कर्मचारी लेटलतिफ असुन दुपारीही लवकरच कार्यालय सोडत असल्याचे नेहमी निदर्शनात येत आहे.सध्याच नविन तहसिलदार रुजु झालेत परंतु तरीही काही अधिकारी कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नसुन वेळेआधीही बरेच कर्मचारी निघुन जात असल्याने या कार्यालयात आता त्वरीत बायोमॅट्रिक मशिन बसवण्याची मागणी जोर धरत आहे.तसेच नियमभंग करणार्‍या कर्मचार्‍यांवर कायदेशिर कारवाई करावी व सेवाशिस्तिचे धडे विद्दमान तहसिलदार यांनी आपल्या कर्मचार्‍यांना द्यावे असेही लोक मागणी करत आहेत.या कर्मचार्‍यांच्या बेताल कारभारामुळे नाहक जनतेच्या वेळेचा आणी पैशाचा अपव्यय होत आहे.या बेताल कारभारावर विद्यमान तहसिलदार लक्ष देतील का?आणी लेटलतिफ आणी वेळेआधीच घराचा रस्ता धरणार्‍या कर्मचार्‍यांची चौकशी करुन कायदेशिर कारवाई करतील का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!