प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक
उपक्रम हाती घेतले. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता,जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहाण्याकरीता वेळोवेळी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, शस्त्र अधिनियम,दारुबंदी अधिनियम,जुगार, अवैध गुटखा प्रकरणी कार्यवाही करुन गुन्हेगारांना कायदयाचा बडगा दाखविला आहे.
वाशिम जिल्हयात अवैध धंदयावर कारवाईचे सत्र सुरु असताना दिनांक २०/०१/२०२२ रोजीपासुन संपुर्ण जिल्हयात मा.पोलीस अधीक्षक, श्री. बच्चन सिंह व अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात अवैध धंदयांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली.

सदर मोहिम यशस्वी करण्याकरीता पोलीस निरीक्षक एस.एम.जाधव, स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी आपले अधिपत्त्याखालील अधिकारी/अमंलदार यांचे ०३ पथक तयार करून सदर पथकामार्फत वाशिम
जिल्हयात दररोज अवैधरित्या जुगार ,वरली मटका चालविणा-या इसमांविरूध्द कारवाई करणे सुरू
आहे. दिनांक २०.०१.२०२२ रोजी गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहीती वरून
१)पोलीस स्टेशन मानोरा हददीतील ग्राम कुपटा येथील इसम अवैधरित्या वरली मटका
चालवित असल्याबाबत कळाले सदर इसमास ताब्यात घेवुन त्यांची विचारपुस केली असता त्याने त्यांचे
नाव गजानन शेषराव ठाकरे, वय ५१ वर्ष रा.कुपटा तसेच घटनास्थळावर इतर ३१ इसम असे एकुण
३२ इसम वरली मटका खेळत असल्याने त्यांना सुध्दा ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता
त्यांचे जवळुन वरली मटका साहीत्य व नगदी १०३८५०/- रू व २० नग मोबाईल किंमत
१३६५००/- रू असा एकुण २४०३५०/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
२) पोलीस स्टेशन मंगरूळपीर हददीतील ग्राम मानोली येथे इसम नामे गोविंदा संतोष भातुरकर,
वय २७ वर्ष रा.मानोली व इतर ४ असे एकुण ५ इसम यांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली
असता त्यांचे जवळुन वरली मटका साहीत्य तसेच नगदी १६७५०/- रू जप्त करण्यात आले.
३) पोलीस स्टेशन मालेगांव हददीतील ग्राम पांग्राबंदी येथे छापा मारला असता इसम नामे
पंडीत रूस्तम खेडकर,वय ३० वर्ष रा.पांग्राबंदी यांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता
त्याचे जवळुन सटटापटी बुक व नगदी ४८१०/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
४)पोलीस स्टेशन मालेगांव हददीतील ग्राम पिंपळवाडी येथील इसम नामे देवराव रघुनाथ लठाड
हा अवैधरित्या ५२ ताश पत्ते वरली मटका चालवित असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमुद इसमाला
ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता ५२ ताश पत्ते व नगदी रोख रक्कम ४६००/- चा
मुददेमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वेगवेगळया पोलीस स्टेशनच्या हददीत
अवैध वरली मटक्यावर छापे मारून एकुण २,६६,५१०/- रूपयाचा रोख रक्कम व मुददेमाल जप्त केले आहे.
