दर्यापूर – महेश बुंदे
तालुका महीला काँग्रेस अध्यक्षा तथा दर्यापूर तालुका संजय गांधी निराधार योजना सदस्या सौ. भारती दिलीपराव गावंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने २० जानेवारी २०२२ ला सकाळीच निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे ४२ वर्ष वय होते, त्यांच्या मागे पती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयाचे कर्मचारी दिलीप पाटील गावंडे, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी, जावई असा मोठा आप्तपरिवार असून त्यांना हिंगणी येथील पूर्णा नदीच्या तीरावर अग्नी देण्यात आला.
