कापूस खरेदी प्रकरणात फिरत्या व्यापार्‍यांकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची फसवणूक,मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल व आरोपीस अटक

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:- सविस्तर वृत्त असे आहे की, ग्राम मेडशी येथे दि. 19/01/2020 रोजी सकाळी 11.00 वा च्या सुमारास तक्रारदार श्री.प्रविण देविदास सोलनोर रा. मेडशी ता. मालेगाव जि. वाशिम हे मेडशी पोलीस चौकी येथे आला व त्यांनी सांगितले की,कापुस विकत घेणारे व्यापारी हे ईलेट्रॉनीक वजन काट्या मध्ये रिमोट च्या सहाय्याने वजना मध्ये फेरबदल करुन फसवणुक करित आहे.

अशा मिळालेल्या माहिती वरुन पोलीस स्टाफ घटनास्थळी गेला असता तक्रारदार ह्याने सांगितले की, कापुस खरेदी करण्यासाठी येणारे व्यापारी हे स्वतः सोबत ईलेक्ट्रीक वजन काटा आणुन त्यावर कापसाचे मोजमाप करित होते.इलेक्ट्रॉनीक काट्यावर वजन दिसत असतांना तक्रारदार यास आरोपी सोबत असलेल्या व्यक्तींनी आळी पाळिने पिण्यासाठी पाणी मागुन तक्रारदाराचे लक्ष विचलित करुन त्याच वेळी आरोपी पैकी एक ईसम नामे मखसुद खान महमुद खान हा त्याच्या खिश्यात असलेले व ईलेक्ट्रॉनीक काट्याशी लिंक केलेले रिमोट कंट्रोलचे विषेश बटन दाबित होता.

त्याच वेळी ईलेक्ट्रॉनीक काट्यावर कापसाचे दिसनारे मुळ वजन कमी दर्शवित होते. अशा प्रकारे कापुस विक्रेते तक्रारदाराचे लक्ष विचलीत करुन मुळ कापसाचे वजन ईलेक्ट्रॉनीक काट्या मध्ये रिमोट कंन्ट्रोलच्या सहाय्याने फेरफार करुन कमी दर्शवुन कापुस विक्रेते शेतक-यांची फसवणुक करित असल्याचे निदर्शनास आल्याने. पो.स्टे. मालेगाव येथे आरोपी नामे 1)मोहम्मद मोसिन मोहम्मद हुसेन 2)शेख
अनिस शेख युसुफ 3) शकिल उर्फ छोटु हुसेन शहा 4) मखसुद खान महमुद खान 5)शहबाज खान ईजाज खान 6)शहजाद खान महमुद खान 7) आशिक खान जफोरउल्ला खान सर्व रा बार्शिटाकळी जि. अकोला यांचे विरुध्द अपराध क्र.29 /2022 कलम 420,34 भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर सर्व आरोपीतांना पोलिस चौकी मेडशी येथिल पोलिस स्टाफ ने तात्काळ ताब्यात घेवुन गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.अशा प्रकारे आणखी किती शेतक-याची फसवणुक झाली आहे. तसेच या प्रकरणाची व्याप्ती किती आहे. या बाबत मालेगाव पोलिस पुढिल तपास करित आहे. तसेच शेतक-यांनी आपला शेतमाल विकतांना ईलेक्ट्रॉनीक काट्यावर वजन व्यवस्थित होत आहे याची खात्री करुनच शेतमाल विक्री करावा असे पोलीसां कडुन आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलिस अधिक्षक साहेब बच्चन सिंह , अपर पोलिस अधिक्षक, श्री गोरख भामरे,ऊपविभागीय पोलिस अधिकारी, सुनिलकुमार पुजारी, यांच्या नेतृत्वा खाली व ठाणेदार किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात सपोनी पुष्पलता वाघ, पो.हे.का गजानन पांचाळ , ना.पो.का आशिष बिडवे , ना.पोका शैलेन्द्र ठाकुर , ना.पोका विजेन्द्र इंगोले व पो.का अमोल पाटिल यांनी केली आहे. मालेगाव पोलीस पुढिल तपास करित आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!