चाकण पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे इसम १) सुनिल देवराम जाधव वय २१ वर्षे, रा. कोकणवाडी ता. अकोले जि. अहमदनगर, २) विशाल बाळु गोडे, वय २१ वर्षे, रा. तेरडे ता. अकोले जि. अहमदनगर त्यांच्या ताब्यातील बजाज पल्सर मोटार सायकल नं. एम एच १२ एफ एल ९४६२ हिचेसह माणीक चौक चाकण येथुन ताब्यात घेतली असता त्यांच्या कडील मिळुन आलेली पल्सर मोटार सायकल ही चाकण पोलीस स्टेशन भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीची असल्याचे चौकशीत समोर आले.
त्यामुळे त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आले. वरील आरोपींकडे अटके दरम्यान सखोल चौकशी केली असता त्यांनी नाणेकरवाडी येथील त्यांचे राहण्याचे खोलीचे परीसरात विक्रीचे उददेशाने चोरी करून लपवुन ठेवलेल्या आणखी ०५ मोटार सायकली काढुन दिल्या असुन सदर आरोपींकडुन सुमारे १,५०,०००/-रु. किंमतीच्या एकुण ०६ चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या असुन वरील आरोपींकडुन खालील प्रमाणे गुन्हयांची उकल झालेली आहे.
जप्त मुददेमाल हस्तगत करण्यात आलेल्या मोटारसायकल
१) भा.द.वि कलम ३७९ हॉन्डा कंपनीची ड्रिम युगा मोटार सायकल नं. MH14 ER 1461
ર) भा.द.वि कलम ३७९ होंन्डा कंपनीची शाईन मोटार सायकल नं. MH14 EX 2615
३)भा.द.वि कलम ३७९ होंन्डा कंपनीची शाईन मोटार सायकल नं. MH14 EW 7312
६) टीव्हीएस कंपनीची स्टार सीटी मोटार सायकल विना नंबरची
वरील प्रमाणे आरोपी १) सुनिल देवराम जाधव वय २१ वर्षे, रा. कोकणवाडी ता. अकोले जि. अहमदनगर, २) विशाल बाळु गोडे, वय २१ वर्षे, रा. तेरडे ता. अकोले जि. अहमदनगर यांचेकडुन गुन्हयांची उकल झालेली असुन सदर आरोपी हे मोटार सायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ मंचक इप्पर, सहा.पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक, विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सागर बामणे,पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण, पो.हवा ऋषीकुमार झनकर, राजू जाधव, पो.ना भैरोबा यादव, हनुमंत कांबळे, मच्छिंद्र भांबुरे, निखील शेटे, पो.कॉ निखील वर्पे, प्रदिप राळे, नितीन गुंजाळ, अशोक दिवटे, महादेव बिक्कड यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास चाकण पोलीस पो.ना शिवाजी चव्हाण हे करीत आहेत.