छत्रपतींचा पुतळा व्हावा ही आमचीही इच्छा – सुधाकर पाटील भारसाकळे

(शिवरायांना नाकारणारे सध्या तरी अस्तित्वात नाही)

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर मध्ये पेट्रोल पंप चौकात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व प्रशासनाने त्यावर केलेली कारवाई यावर काही विशिष्ट मंडळी आपल्या राजकारणाची पोळी शेकत असून विनाकारण सदर प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या आमदारांना तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना लक्ष करत खालच्या पातळीवर टीका करण्यात येत आहे यासह खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी करत लोकप्रतिनिधींना विनाकारण यात ओढले जात आहे. छत्रपती आमच्या हृदयात असून त्यांचा पुतळा दर्यापूर मध्ये असावा अशी आमची ही तीव्र इच्छा आहे अशी प्रतिक्रिया दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी दिली. दर्यापूर शहरात छत्रपतींच्या पुतळ्याची मागणी गेल्या तीस वर्षापासून होत आहे याकरिता मागील काळात खटाटोप करण्यात आला त्यावेळी छत्रपतींचा पुतळा नियोजित जागी बसवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता मात्र प्रशासनाने अशाच प्रकारची कारवाई करत सदर पुतळा जप्त केला होता त्यानंतर तब्बल तीस वर्षांनी पुन्हा याच जागी छत्रपतींचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न झाला.

मागील तीस वर्षाच्या कालखंडात त्यावेळच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुन्हा पुतळा बसवण्यासाठी हालचाल केली गेली नाही यावेळी छत्रपतींचा पुतळा नियोजित जागी युवा वर्गाने एकत्र येत बसवण्याचा प्रयत्न झाला असताना व सर्वच स्तरातून त्यास पाठिंबा मिळत असताना केवळ नगरपालिकेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षावरच टीकेचे लक्ष साधून आपले राजकारण शेकण्याचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचे सुधाकर पाटील भारसाकळे यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या करीता आम्ही आमच्या परीने प्रयत्न करणार आहोतच या जागी छत्रपतींचा पुतळा असावा याबद्दल आमदार बळवंत वानखडे, जि. प. आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणिकर यांच्यासोबत मागील काळात चर्चाही झाली आहे असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया —

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आम्हाला नितांत आदर आहे. दर्यापूर मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा असावा अशी आमचीही इच्छा आहे मात्र त्याकरता रीतसर व कायदेशीर परवानगी घेऊनच पुढील कार्यवाही होणे अपेक्षित आहे. यावेळी झालेला पुतळा स्थापन करण्याचा प्रयत्न योग्यच आहे त्यास आमचा कोणताही विरोध नाही असे असताना काही लोक केवळ राजकीय स्वार्थासाठी खालच्या पातळीवर टीका करत आहेत हे चूक आहे त्यामुळे शहरतील वातावरण दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी

—- बाळासाहेब हिंगानिकर (जि प वित्त व आरोग्य सभापती, अमरावती)

छत्रपतींचा पुतळा हा विषय दर्यापूर मधील सामान्य जनांच्या मनातील आहे याकरता आमच्याकडून सहकार्यच राहणार आहे मात्र विनाकारण यात काँग्रेस पक्ष , महिला पालकमंत्री, आणि माझ्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात आली यासह छत्रपतींच्या पुतळ्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष आहे अशा प्रकारचा भ्रम पसरविण्यात काही लोकांनी पुढाकार घेतला हे तुच्छ राजकारण आहे अशा राजकारण्यांपासून लोकांनी सावध राहावे

बळवंत वानखडे (आमदार, दर्यापूर मतदार संघ)

छत्रपती शिवाजी महाराज हे कुण्या एका जाती पंथाचे पक्षाचे नसून संपुर्ण भारतीयांच्या मनात अधिराज्य गाजविणारे महाराज होते सर्व जाती धर्माचे लोक त्याच्या खांद्याला खांदा लावून मदत करत असत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या हृदयात आहेत ते स्पस्ट करण्याची आवश्यकता नाही भाषणात सुरुवातीला माझ्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराज यांचाच प्रामुख्याने उल्लेख केला जात असतो घटनेची पूर्व कल्पना मला नसतांना मी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही त्यामुळे माझा विरोध आहे असा अर्थ होत नाही

सुधाकर पाटील भारसाकळे (तालुका अध्यक्ष काँग्रेस दर्यापूर)

महाराजांचा पुतळा दर्यापूर शहराच्या ठिकाणी नसणे ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. सांस्कृतिक वारसा असलेल्या दर्यापूर शहराला महाराजांचा पुतळा असल्यास मराठ्यांना स्फूर्ती मिळेल त्याचबरोबर शिवाजी महाराज एका कोण्या जाती धर्माचे पंथाचे नसून एका पक्षाचे नसल्याने ते आपल्या संपूर्ण भारतीयांचे होते पुतळा उभारण्यासाठी सर्वांनीच मला साथ दिली त्यामुळे मी वैयक्तिकरित्या कुण्या पक्षावर व कुणावरही टीकाटिपणी केली नाही महाराजांचा पुतळा आगामी काळात बसवून दाखवूच

गोपाल पाटील अरबट
(शिवसेना तालुकाप्रमुख दर्यापूर)

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!