बोगस पुरवठा अधिकारी व पत्रकारचा बनाव करणाऱ्या दोन खंडणी बहादरांना महाळुंगे पोलीसांनी ठोकल्या बेड़या

चाकण वार्ता :- गेले काही महिन्यापासून पुणे जिल्ह्यातील महाळुंगे व परिसरातील गॅस शेगडी दुरुस्ती दुकानदारांकडे दोन व्यक्ती येवुन, ते खेड तहसिल कार्यालयामधील पुरवठा अधिकारी असल्याचे सांगुन, दुकानदारांना त्यांच्या दुकानामध्ये गॅस सिलेंडर टाकी कशी काय ठेवली ? तुमच्यावर कारवाई करणार आहे. व कारवाई करावयाची नसेल तर दर महिना १०,०००/रु चा हप्ता चालु कर असे बोलून तडजोडअंती ५,०००/रु घेवून जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की पुरवठा अधिकारी म्हणुन गॅस शेगडी दुकानदारांकडुन खंडणी घेणाऱ्या व्यक्ती पैकी एक व्यक्तीने पुर्वी पत्रकार म्हणुन काम केले आहे व तो त्याच्या साथीदारासह येवून पुरवठा अधिकारी असल्याचे भासवुन कारवाई करण्याची धमकी देवुन गैस शेगडी दुरुस्ती दुकानदारांकडून पैसे घेत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी गॅस शेगडी दुकानदार यांना पुन्हा त्या व्यक्ती आल्यास तात्काळ त्यांची माहिती पोलीसांना कळवा असे आवाहन केले होते. त्यानुसार

दि.१८जानेवारी २०२२ रोजी दुपारी 1 च्या सुमारास तक्रारदार प्रशांत माणिक पायगुडे हे त्यांच्या ओम साई गैस शेगडी रिपेअरिंग दुकानामध्ये काम करीत असताना पायगुडे कडे दोन व्यक्ती गेले. त्यापैकी एकाने, तो खेड तहसिल कार्यालयातील पुरवठा अधिकारी असल्याचे व त्याचे नाव नेहे पाटील असल्याचे सांगितले व दुकानात गैस सिलेंडर कसा काय ठेवला ? तुझ्यावर कारवाई करावी लागेल व कारवाई करावयाची नसेल तर दरमहिना इतर दुकानदार देतात त्याप्रमाणे १०,००० / रु चा हप्ता चालु कर, असे म्हणाला, सदर तक्रारदार प्रशांत माणिक पायगुडे यांना संशय आल्याने महाळुंगे पोलीस चौकीस त्यानी माहिती दिली. महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार यांनी तक्रारदार यांच्या दुकानामध्ये जाऊन खात्री करता पुरवठा अधिकारी असे सांगणारे व्यक्तीकडे शासकिय ओळखपत्र नसल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेवून अधिक चौकशी करून त्या दोन्ही खड़णी बहाद्दरांच्या विरुद्ध चाकण पोलीस ठाणे गुन्हा भा.द.वि. कलम ३८४ ३८५,१७० ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यांना दि १९ जानेवारी २०२२ रोजी अटक करून त्यांची दि २१जानेवारी २०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.

अटक आरोपी


१) ज्ञानेश्वर त्रिंबक नेहे, वय ५७ वर्ष, रा-सेक्टर नंबर ४ प्राधिकरण मोशी.
(२) संदीप नानासाहेब बोर्डे, वय ३५ वर्ष रा-हनुमान हौसिंग सोसायटी, रुपीनगर, पुणे

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ,अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ मंचक इप्पर व पोलीस उपआयुक्त, परिमंडळ २आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचे सुचना 4 मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार,पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, रा.पो.निरीक्षक सारंग चव्हाण, पोलीस हवालदार राजेंद्र कोणकेरी,अमोल बोराटे, ज्ञानेश्वर आटोळे, विठ्ठल वडेकर, तानाजी गाडे, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, शिवाजी लोखंडे, शरद खैरे ,श्रीधन इचके यांनी पार पाडली. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण हे करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!