दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर येथील प्रतिष्ठित नागरिक, सहकार नेते, स्वर्गीय बाबासाहेब सांगळूदकर स्मृती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अशा एक नाही तर अनेक सहकार क्षेत्रात त्यांचा चांगलाच दबा दबा होता. सहकार क्षेत्रातील तसेच राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्दज व्यक्तिमत्त्व कुलदीप पाटील गावंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या अनेक चाहत्यांनी, नातेवाइकानीं व मित्र परिवाराने गर्दी केली होती.

यावेळी या शोकसभेचे अध्यक्षस्थान आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी भूषविले होते. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात आमदार बळवंत वानखडे, गुलाबराव गावंडे, अकोटचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक या मान्यवरांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
