Post Views: 340
आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या नेतृत्वावर भातकुली वासीयांचा पुन्हा विश्वास,
प्रतिनिधी ओम मोरे:-
अमरावती :- महाविकास आघाडीचा प्रयोग फसला,मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील काँग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव,शिवसेनेचा बहुमताच्या दाव्याचा फुगा फुटला,राज्यमंत्री बचु कडू यांच्या पॅनल ला भोपळा,युवा स्वाभिमानचे 9 व समर्थीत 2 अपक्ष असे एकूण 11 उमेदवार निवडून आल्याने आता संपूर्ण पाच वर्षे आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली युवा स्वाभिमान पार्टी ची एकहाती सत्ता असणार,एकूण मतदानापैकी सरासरी 82%मतदान युवा स्वाभिमान पार्टी ला व केवळ 18%इतरांना झाल्याने मतदारांचा संपूर्ण कौल युवा स्वाभिमान लाच असल्याचे स्पष्ट
भातकुली वासीयांनी कुठल्याही अपप्रचाराला किंवा दबावाला बळी न पडता पुन्हा विश्वास ठेवून केवळ विकासाची बात-विकासाला साथ देण्यासाठी पुन्हा एकदा युवा स्वाभिमान पार्टी ला बहुमत दिल्याबद्दल आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी मानले सर्व भातकुली वासीय मतदार बंधू भगिनींचे आभार,व केले सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन,निवडणूक संपली-राजकारण संपले,आता सर्वांना सोबत घेऊन उर्वरित विकासाला चालना देणार-आमदार रवी राणा यांचे प्रतिपादननिवडणूक प्रचाराचे वेळी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार व भातकुलीवासीयांना नाविण्यपूर्ण विकासाचा आरसा दाखविणार-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे वचन
युवा स्वाभिमान पार्टी चे विजयी उमेदवार ,,योगिता राजू लोलटके ,निवेदिता पवार पुरुषोत्तम खरचान ,शंकर डोंगरे, अर्चना राजेश ठोंबरे ,सुनील भोपसे ,डॉक्टर संजय सोळंके, प्रतीक कांडलकर,दिपाली रवींद्र गावंडे यांचे युवा स्वाभिमान पार्टी च्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून अत्यंत भातकुलीत युवा स्वाभिमान पार्टीची एकहाती सत्ता.. मताने पराभूत झालेल्या स्वाभिमानी शिलेदारांनी खचून न जाता आपले जनसेवेचे व्रत चालूच ठेवावे असे आवाहन युवा स्वाभिमान पार्टी ने केले आहे,व सर्व भातकुली वासीयांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता या पंचवार्षिक मध्ये भातकुलीला नवे रूप देण्यासाठी आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा कटिबद्ध असल्याचे युवा स्वाभिमान पार्टी पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे