Post Views: 382
शेख इरफान यांचे प्रशासकीय विभागांना लेखी निवेदन
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर शहरातील प्रत्येक प्रभागात झालेले 2019 पासून निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रोडची गुण मापक नियंत्रण विभागा मार्फत, सर्व कामाची चौकशी होणेसाठी शेख ईरफान शेख हुसेन. रा. अशोक नगर मंगरूळपीर जिल्हा वाशीम यांनी सबंधित विभागांना लेखी निवेदन सादर केले आहे.
मंगरूळपीर शहरातील काही भागात, समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शहरी सुधार योजना अंतर्गत अशोक नगर प्रभाग 8 व 9 मध्ये झालेले रस्त्याच्या बांधकाम व नाली बांधकाम हे निकृष्ट दर्जाची झाली असुन या कामात नगर पालिकेच्या सबंधित अधिकारी व न प सदस्य आणी कंत्राटदार यांणी संगणमताने कामात अफरातफर केली ,कामाचा दर्जा हा दर्जाहीन करून कामे निक्रुष्ठ दर्जाची केलीत,व भरमसाठ शासनाच्या निधीची जंगी लुट केली,भविष्यात ही कामे नागरीकांच्या जिवनमाना करीता धोकादायक ठरणार असुन,शासन-प्रशासनाची नगर परिषदेच्या विभागातील सबंधितांनी संगनमत करून फसवनुक व लुबडनुक केली असुन.
शहरातील व प्रभाग क्रं 8 आणी 9 अशोक नगर मधील कामाची चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सादर केले व शासन – प्रशासन स्तरावरील निधीचा झालेल्या अपहाराची चौकशी करून नगर परिषद बांधकाम विभागातील सबंधितावर फसवेगिरी सह विविध फौजदारी गुन्हे दाखल करून सबंधीत कंत्राटदार याला काळ्या यादीत घालुन त्यास यापुढे कुठलेच कंत्राट येत्या पाच वर्षात देऊ नये असा ठराव घेण्यात यावा व ऊपेक्षीत असलेल्या नागरिकांना मुलभुत गरजा पूरवुन त्यांचे जिवनमान ऊंचवावे ,अन्यथा मला नाईलाजास्तव येत्या 8. मार्च महिला दिन औचित्याने मोठे आंदोलन ऊभे करावे लागनार असल्याचा इशाराही या निवेदनाव्दारे शेख इरफान यांनी दिला आहे.