चिंबळी /प्रतिनिधी सुनील बटवाल :- दि१९( वार्ताहर) खेड तालुक्यातील विविध भागांमधील गावा गावात जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत ग्रामपंचायतीच्या १४विक्त आयोजित निधीमधून सुरु असलेल्या विविध कामाची चौकशी करून दर्जेदार होतात की नाही हे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचे काम असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी कुरुळी येथे केले .
कुरुळी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने १४ विक्त आयोग निधीतून कांबळे वस्ती येथील ७५ मिटर लांबी व १२ फुट रूंद सिमेंट क्राॅक्रीट रत्साच्या कामाला ५लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असुन या कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी पंचायत समितीचे बी डी ओ अजय जोशी सभापती अरुण चौधरी शाखा अभियंता हनुमंत कचरे बापू साहेब शिंदे विस्तार अधिकारी एस एस साळूंके ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल सरपंच कविता गायकवाड उपसंरपच विशाल सोनवणे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष एम के सोनवणे गुलाब सोनवणे सदस्य शरद मु-हे अमोल सोनवणे नितीन कड नेहा बागडे पोलीस पाटील प्रतिभा कांबळे माजी उपसरपंच अमित मु-हे युवा उद्योजक विशाल सोनवणे सुमित सोनवणे सखाराम बागडे अजित गायकवाड स्वप्निल कांबळे ज्ञानेश्वर गोसावी आदी मान्यवरांसह सर्व सदस्य व आजी माजी पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते यावेळी कुरुळी गावातील दफन भुमी (मट) या कामाची ही पाहणी करून ग्रामपंचायतीच्या वतिने सुरू असलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने आयुष्य प्रसाद यांचा गुलाब पुष्प देऊन सरपंच उपसरपंच व सदस्यांच्या हस्ते करण्यात सत्कार
