प्रतिनिधी संकेत शिंदे उदापुर :-
जुन्नर वार्ता :- उदापूर मधील शेतकऱ्यांनी मांडले महावितरण संघाचे आभार,
उदापूर गणेश नगर डीपी नंबर दोन याठिकाणी गेले काही दिवसांपासून डीपी बंद असल्या कारणामुळे येथील शेतकऱ्यांची पाण्यामुळे शेतमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान
व वीज नसल्यामुळे मोटर पंप बंद असल्याने शेतकऱ्यांची टंचाई भासत होती. मग तेथील शेतकऱ्यांनी स्थानिक वायरमन मनोज चौधरी यांना कळवले त्यांनी चौकशी केली व वीज खंडित होण्याचे कारण बीपी बाटला सेल खराब असल्याचे सांगितले त्वरित त्यांनी ओतुर विभागाकडून मंचर विभागाला वरिष्ठांना कळविण्यात आले.
तसेच त्यांनी शेतकऱ्यांची वीज बिले भरण्यास सांगितले मग अवघ्या तीन ते चार दिवसात वायरमन मनोज चौधरी व उदापूर शेतकरी यांच्या प्रयत्नाला हिरवा दिवा भेटला काम पूर्ण पार पडले शेतकऱ्यांनी वायरमेन मनोज चौधरी वरिष्ठ अधिकारी श्रीकांत अवचार साहेब यांचे आभार मानले.
