आमदार निधी व मूलभूत सुविधा अनुदानातून शहरात आला विकासाचा झंझावात,आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण शेगांव नाका परिसरातील विविध भागात ४५.२३ लक्ष निधीतून विकास कामे मार्गी
अमरावती १९ ऑक्टोबर : महानगरात मूलभूत सोयी सुविधांची कामे मार्गी लागण्यासाठी आ. सुलभाताई खोडके यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या कडे अनुदान मिळण्यासाठी नियोजित विकास कामांचा प्रस्ताव सादर केला होता .
याची फलश्रुती म्हणून मूलभूत सोयी सुविधांचा विकास कामांसाठी प्राप्त विशेष अनुदानांतर्गत आ. सुलभाताई खोडके यांनी विकास कामांचा सपाटा लावला आहे. याच शृंखलेअंतर्गत मंगळवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२१ रोजी शेगांव नाका परिसरातील विविध वसाहतीमध्ये ४५.२३ लक्ष निधीतील विकास कामांचे लोकार्पण आ. सौ . सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले.
अमरावती विधानसभा मतदार संघामध्ये स्वच्छता, सुशोभीकरण, अखंड विद्युत पुरवठा, प्रशस्त रस्ते, स्वच्छ प्रशासन आदींसहित विकासकामांच्या पूर्ततेतून शहराचा चेहरामोहरा बदलण्याकरिता आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या वतीने सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहे. शहरी क्षेत्राच्या विकासात नागरिक केंद्रित धोरण राबविण्याकरिता जनतेच्या आशीर्वादाने आणि साथीने विविध विकासकामे आणि त्यांच्या पुर्णत्वातून पर्याप्त प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता त्या अविरत परिश्रम घेत आहे. यासोबतच शहरामध्ये रस्ते काँक्रिटीकरणासह प्रभागांप्रभागामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची नियोजनबद्धता याकरिता विकासकामांसाठी विकास आराखडा तयार करीत त्याची गतीने पूर्तता करण्याकरिता आमदार महोदयांच्या वतीने सातत्यपूर्ण प्रयत्नांची मालिका सुद्धा राबविल्या जात आहे. शहरी भागातील शेगांव नाका परिसरात रहिवाशी क्षेत्र झपाट्याने वाढत असल्याने येथे मूलभूत सुविधांची उपलब्धता व्हावी यासाठी ४५.२३ लक्ष निधीतून विकास कामे मार्गी लावून त्याचे लोकार्पण आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत ७.८३ लक्ष निधीतुन रहाटगाव रोड ते केवल कॉलनी मधील रस्ता डांबरीकरणाच्या कामांचा तसेच कल्पना नगर येथे १५ लक्ष निधीतून साकारण्यात आलेल्या रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा समावेश आहे. तर आमदार निधी अंतर्गत
९.५० लक्ष निधीतून पूर्णत्वास आलेल्या करडे नगर हरिओम कॉलनी येथील नाली बांधकामाचा समावेश आहे. तर हॉलिवूड कॉलनी करडे लेआऊट मधील नालीचे बांधकाम देखील ५.१५ लक्ष निधीतून करण्यात आले आहे. या प्रसंगी आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी विकास कामांच्या नामफलकांचे उदघाटन करून लोकार्पणाची औपचारिकता पूर्ण केली . त्याच बरोबर शेगाव नाका परिसरातील विश्वप्रभा कॉलोनी येथे आमदार निधी अंतर्गत ७.७५ लक्ष निधीतून मंजूर रस्ता बांधकामाचे सुद्धा आ. सौ . सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान आमदार महोदयांनी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत निवेदनाचा स्वीकार केला .
गेल्या अनेक वर्षांपासून स्थानीय नागरिकांच्या वतीने वतीने रस्ते विकास , नाली बांधकाम , सौदर्यीकरण सारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध कर्नू देण्याची मागणी केल्या जात होती. आमदार महोदयांचे या बाबीकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. स्थानीय नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी मूलभूत सोयीसुविधा अनुदानातून शेगांव नाका परिसरातील विविध भागात ४५.२३ लक्ष निधीतून विकास कामे मार्गी लावली आहे.

शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे नागरी वसाहतींमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्वक रस्ते स, सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नाल्याचे बांधकाम , तसेच वीज व नळजोडणी, सौदर्यीकरण आदी मूलभूत सुविधांची पूर्तता करून जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी आपले प्राधान्य असल्याचा विश्वास आ. सौ सुलभाताई खोडके यांनी यावेळी व्यक्त केला .यावेळी आमदार साै. सुलभाताई खोडके समवेत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, नगरसेवक – प्रशांत डवरे, प्रशांत महल्ले, माजी नगरसेवक – प्रविण मेश्राम, यश खोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता – विनोद बोरसे, शाखा अभियंता – अनिल भटकर, शाखा अभियंता – महादेव मानकर, शाखा अभियंता – सुनिल जाधव, स्थापत्य अभियंता – स्वप्निल तालन, सहाय्यक कनिष्ठ अभियंता – हर्षद धांडे, कंत्राटदार – इमरान खान गफ्फार खान, कंत्राटदाराचे अभियंता – अनिल लांडगे, मनपा उपअभियंता – प्रमोद इंगोले, मनपा कनिष्ठ अभियंता – अंकुर डवरे, मनपा नगररचना विभागाचे – प्रकाश निर्मळ, मनपाचे सॅनीटरी इन्सपेक्टर – परिक्षित गोरले, अॅड सुनिल बोळे, प्रशांत पेठे, बंडु निंभोरकर, भोजराज काळे, अॅड विनोद नागापुरे, रत्नदिप बागडे, शरद वानखडे, गजानन पवार, साै. सुलु मनवर, सुनंदा वानखडे, रमा वानखडे, संगिता तंतरपाळे, उज्वला चतुर, विश्वजा वानखडे, किरण तिनखेडे, संगिता चाैधरी, लता वंदे, भाग्यश्री भटकर, शितल तिनखेडे, रेखा केने, विमल गावंडे, अंजली तिनखेडे, तायडे, इखार, रेखा भटकर, स्मिता गावंडे, जया सोनेकर, शिल्पा झुंझारे, स्वाती काटे, मनिषा गुल्हाने, प्रिती वाघुळे, मनिषा गुल्हाने, उज्वल राऊत, सुजाता ससाने, अर्चना गुल्हाने, माधुरी रेळे, विना चाैधरी, शारदा ढवळे, सरला इंगळे, वंदना वाघ, अलका डिघिये, अर्जुन वानखडे, अनिल शिरभाते, सुनिल राैराळे, सिध्दार्थ ढोणे, दिपक इंगळे, प्रशांत राैराळे, बकारामजी आत्राम, मंगेश पेटले, रामेश्वर देशमुख, अभिलाष नरोडे, साहेबराव इंगळे, रमेश वानखडे, सिध्दार्थ दांडगे, राजु मकेश्वर, सुनिल सावळे, कुंदन ठाकुर, गणेश इंगोले, बाळकृष्ण आेगले, वासुदेव वर्धे, रविंद्र वानखडे, हरेश मोंढे, प्रा. रवि वाकोडे, ज्ञानेश्वर शिरसाट, राजु जामनेकर, अर्जुन खंडारे, गजानन काळे, श्रीकांत तंतरपाळे, विशाल वाकपांजर, सतिश बोरकर, दिनकर मापले, विनोद मनवर, बाळासाहेब तंतरपाळे, अनिल शेंडे, गोविंद वानखडे, श्रीकांत तंतरपाळे, उमेश वानखडे, विक्रम खोडके, संकुल सव्वालाखे, एस.बी. वानखडे, पंकज बोरवार, सचिन तायडे, भुषण देशमुख, गणेश चांदणे, अभिषेक देशमुख गोंगे साहेब, जावरकर, अनिल शेंडे, आत्राम, राहुल बोरवार, चव्हाण, खंडारे, शेखर शेंडे, दिपक कोरपे, अविनाशे, प्रविण मेश्राम, धर्मा इंगळे, विवेक फुले, गजानन काकडे, डाॅ. आनंद मानकर, रुपेश अविनाशे, नरेंद्र चाैधरी, बाबुराव तायडे, भगवान वाहुरवाघ, अनिल हिरेखन, विजय पारडे, खुशालराव पाटील, काशीनाथ बनसोड, बापुराव आकोलकर, पुरुषोत्तम गावंडे, प्रा. मनोहर महाजन, श्रीकृष्ण भटकर, नरेंद्र बुरघाटे, अनिल विधळे, लक्ष्मण गवई, भिमराव वंदे, डाॅ. रामदास देवघरे, अजय तिनखेडे, संदिप गावंडे, रविंद्र भटकर, संदीप गावंडे, शरद तायडे, प्रशांत ठाकरे, लक्ष्मण गवई, वासुदेव चोपडे, अरुण विधाते, शरद काटे, रंजीत गुडधे, प्रदिप ढोरे, विष्णुपंत खंडारे, एन.पी. वानखडे, राजेंद्र सोनार, जि.एम. इंगळे शंकरराव ढवळे, डाॅ. आशिष वानखडे, रवि राठोड, मनोज राऊत, पवन वानखडे, प्रदिप ससाने, मधुकरराव आकोलकर, सागर फुटाणे, सागर इंगळे, राजेंद्र वैराळे, गाैरव धांडे, प्रशिक समदुरे, आशिष ढवळे, गुल्हाने, दिपक समदुरे, अखिलेश राऊत, गजानन चाैधरी, नामदेवराव वानखडे, शंकर ढवळे, मनोज राऊत, रवि राठो़ड, संदिप वाघुळे, प्रविण पाटील, प्रदिपकुमार ढोरे, राजेंद्र सोनार, पवन वानखडे, राहुल रेळे, प्रणित वाघ, अनिल बिजवे, शरद काटे, मनोज आेंकटे, प्रमोद सोनेकर, उदय काळमेघ, स्वप्निल बंड, पुरुषोत्तम बागडी, श्रीधर गुल्हाने, नंदकिशोर लाऊडकार, राजेंद्र वैराळे, विनय साठे, गजानन चाैधरी, अविनाश झुंजारे, प्रशिक समदुरे आदी सहित विश्वप्रभा काॅलनी, केवल काॅलनी, करडे लेआऊट, कल्पना नगर, येथील जेष्ठ नागरीक, युवक बांधव व महिला भगीनी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
रवि मारोटकर ब्युरो चीफ