उद्यापासून वरिष्ठ महाविद्यालय ही सुरू होणार…शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही लस घेणे आवश्यक ,विद्यार्थ्याचे दोन्ही डोस बंधनकारक.
प्रतिनिधी महेश बुंदे
अमरावती वार्ता :- दर्यापूर शहरात दोन वरिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यातील विद्यार्थ्यांची संख्या २ हजार ४०० च्या जवळपास आहे. शाळा सुरू झाल्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयात ऑफलाइन सुरू व्हावे यासाठी विद्यार्थ्यांची विचारणा होत होती.
दरम्यान दिवाळीनंतर महाविद्यालय सुरू होतील, अशी अपेक्षा असताना राज्य शासनाने २० ऑक्टोंबर पासून ५० टक्के व त्यापेक्षा कमी उपस्थितीत ऑफलाईन वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कोविड नियमांची आचारसंहिता महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना वर्गात बसायचे आहे त्या विद्यार्थ्यांचे कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे आवश्यक आहे.
त्यानुसार महाविद्यालयांमध्ये वर्ग सुरू करण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. विद्यार्थ्यांने महाविद्यालयात येत असताना मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य असल्याचे जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिनदयाल ठाकरे तसेच श्रीमती कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अविनाश चौखंडे यांनी सांगितले.