Post Views: 727
प्रतिनिधी सुभाष कोटेचा :-
अमरावती वार्ता :- चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनगाव-शिवणी धरण प्रकल्पात एका ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी (ता. १८) दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली. प्रशांत बळीरामजी जांभोरकर (३० वर्ष) रा. धानोरा म्हाली असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्तमाहितीनुसार, चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनगाव येथे सोनगाव – शिवणी धरण प्रकल्प चंद्रभागा नदीवर बांधण्यात आले आहे. सदर धरण यंदा १०० टक्के भरलेले आहे. अशातच चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली येथील प्रशांत बळीरामजी जांभोरकर (वय ३०) हा युवक गेल्या ३ दिवसांपासून बेपत्ता होता. सदर युवकाचा मृतदेह सोमवारी या सोनगाव – शिवणी धरणात आढळला. या घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले होते. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता स्थानिक ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात हे.काँ. श्रीकृष्ण शिरसाट करीत आहे.