लॉकडाऊनमध्ये भरलेल्या वीज बिलाची रक्कम येत्या दिवाळीपर्यंत परत करा

लॉकडाऊनमध्ये भरलेल्या वीज बिलाची रक्कम येत्या दिवाळीपर्यंत परत करा,विदर्भ राज्य आंदोलन समिती, चांदूर रेल्वे ची मागणी

चांदूर रेल्वे प्रतिनिधी (सुभाष कोटेचा):-

अमरावती वार्ता :- राज्यातील नागरिकांनी लॉकडाऊनमध्ये भरलेल्या वीज बिलाची रक्कम येत्या दिवाळीपूर्वी परत करावी अशी मागणी चांदूर रेल्वे येथील विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे स्थानिक उपकार्यकारी अभियंता यांच्या मार्फत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून सोमवारी करण्यात आली.

केंद्र व राज्य सरकारने कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता देशात व राज्यात २४ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर केले होते. लॉकडाऊनच्या काळात विज ग्राहकांचे व्यापार, कारोबार, व्यवसाय, शेतीधंदे असे पूर्णपणे बंद होते. असे असून सुद्धा लॉकडाऊन च्या काळातील दिलेल्या वीजबिलाचा भरणा भरून चांदूर रेल्वे येथील जनतेने वीज कंपनीला एक प्रकारे सहाय्यच केले आहे.

परंतु ऊर्जामंत्री यांनी जाहीरपणे लॉकडाऊनच्या काळात वीज बिल माफ करण्यात येईल असे म्हटले व अभिवचन दिले होते. तसेच १०० युनिटपर्यंत फ्री, १०१ ते २०० पर्यंत ५० टक्के आणि ३०० युनिट च्यावर २५ टक्के बिजबील माफ करण्याची घोषणा केली होती. त्याकरिता १८०० कोटी चा प्रस्ताव पाठवला असून दिवाळीनंतर गोड बातमी देण्यात येईल असे सन २०२० च्या दिवाळीपूर्वी जाहीर केले होते असे निवेदनात नमूद केले आहे. परंतु अद्याप पर्यंत दिलेल्या घोषणेची पूर्तता केली नाही, तसेच शिवसेनेने निवडणुकीपूर्वी ३०० युनिटपर्यंत ३० टक्के सवलतीची घोषणा केली होती. मात्र ती घोषणा सुध्दा पुर्ण केली नसल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीने म्हटले आहे.

त्यामुळे लॉकडाऊनमध्ये भरलेल्या वीजबिलाची रक्कम येत्या दिवाळीपूर्वी परत करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना उपकार्यकारी अभियंता महावितरण यांच्या द्वारे पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुकाध्यक्ष अशोक हांडे, शहराध्यक्ष बाबाराव जाधव, तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशमुख, शहर उपाध्यक्ष दीपक शंभरकर, जि. कोरकमिटी सभासद सुरेन्द्र खेरडे, संदीप देशमुख, गजानन दुर्योधन, बंडू राऊत, गजानन सूर्यवंशी, सुरेंद्र मेटे, बाबारावजी शेळके आदी उपस्थित होते. यावेळी वीज वितरण कार्यालयाबाहेर येऊन आपले राज्य – विदर्भ राज्य, बंद करा बंद करा विदर्भाच्या जनतेची फसवणूक बंद करा, ऊर्जामंत्री हाय – हाय, परत करा परत करा मधली रक्कम परत करा अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!