बग्गी ग्राम पंचायतमध्ये 51 लाभार्थ्यांना मोफत गॅस कनेक्शन वाटप,सरपंचा विजया चवाळे यांचे प्रयत्न
प्रतिनिधी चांदूर रेल्वे ,सुभाष कोटेचा:-
अमरावती वार्ता :- चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच विजया चवाळे यांच्या अथक प्रयत्नाने प्रधानमंत्री उज्वला मोफत गॅस कनेक्शन ५१ गरजू महिलांना वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान गावातील उपस्थित लाभार्थ्यांना ग्रा. पं. सचिव डी. आर. इसळ यांनी गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन केले तर उपसरपंचा सोनाली दांडगे यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. तर सरपंचा विजया चवाळे यांनी महिलांना मार्गदर्शन करून महिला गीत सुध्दा सादर केले. गॅस एजन्सीचे संचालक अरूण जयस्वाल यांनी मोफत गॅस योजनेचे महत्व समजून सांगीतले. यावेळी नंदाबाई इंगळे, लक्ष्मन चौधरी, मुकुंद कासार, राजू घोडे, प्रकाश दांडगे तसेच गावातील लाभार्थी महीला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रकाश चवाळे यांनी केले.