जिल्हातील हजारो शिक्षकांचे डिसेंबरचे वेतन रखडले
अमरावती – महेश बुंदे
जिल्हा परिषदेचे कर्मचारी,शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे वेतन व सेवानिवृत्ती वेतन दर महिन्याच्या एक तारखेला अदा करणेबाबत उपरोक्त दि. ४ जुन २०११ च्या परिपत्रकान्वये सर्द संबंधीतांना सुचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे बीम्स प्रणालीवर अनुदान अप्राप्त असल्यास उणे प्रधिकारपत्र काढण्याची सोय शासनाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध केली असल्याचे व त्यामुळे यापुढे अनुदान अभावी कोणाचेही वेतन थांबवू नये, अशा सुचना ग्रामविकास विभागाच्या क्र.सेवार्थ २०१५/प्र.क्र.२५/वित्त ६ अ दि.३१ जुलै २०१५ या परिपत्रकान्वये सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या आहेत.पण आज पर्यंत अमरावती जिल्हा परिषदने या बाबत कार्यवाही केलेली नाही. शिक्षकांना दर महीण्याला वेतन २५तारखे नंतर मिळत आहे. शिक्षक व सेवानिवृतांना वेतन cmp किंवा zpfms प्रणालीव्दारे वेतन अदा करण्याची मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत,सरचिटणीस संभाजी रेवाळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदनाव्दारे केली आहे. अनुदान उपलब्ध नसल्याचे कारण वगळता प्राथमिक शिक्षकांचे वेतन कधीही महिन्याच्या एक तारखेला होत नाही. वेतनबिले ५तारखेच्या आत ऑनलाईन जेनरेट होत असतांना जिल्हा कार्यालयातुन थेट शिक्षकांच्या खाती वेतन जमा करणेसाठी CMP किंवा ZPEMS सारख्या संगणक प्रणालीचा वापर मोठया संख्येने काम करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी करणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेला प्रकर्षाने जाणवते.
